Chetan Vadnere Marries to Actress Rujuta Dharap 
Premier

Chetan Vadnere News : "आमचं ठरलं होतं आधीच...", भन्नाट उखाणा अन् लग्नाचा मराठमोळा थाट; चेतन-ऋजुता अडकले विवाहबंधनात

Chetan Vadnere Marries to Actress Rujuta Dharap : नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत चेतन आणि ऋजुता यांनी लग्न केलं आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Chetan Vadnere Marries to Actress Rujuta Dharap : मराठी सिनेविश्वात लगीनघाई सुरु आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मराठी कलाकारांचा विवाहसोहळा पार पडला आणि आता 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेता चेतन वढनेरे विवाहबंधनात अडकला. अभिनेत्री ऋजुता धारपशी त्याने आज म्हणजे २२ एप्रिल २०२४ ला लग्नगाठ बांधली. नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत चेतन आणि ऋजुता यांनी लग्न केलं. सोशल मीडियावर नुकतेच त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावरील त्यांचे लग्नाचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. या खास दिवसासाठी ऋजुताने मोरपंखी रंगाची नऊवार साडी आणि त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाउज असा लूक केला होता तर चेतननेही जांभळ्या रंगाचं धोतर, पांढऱ्या रंगाचा सोनेरी कडा असलेला शेला नेसला होता. सप्तपदीसाठी त्यांनी केलेला हा लूक सगळ्यांना खूप आवडला. तर मंगलाष्टकांसाठी ऋजुताने पिवळ्या आणि जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली नऊवार नेसली होती तर चेतनने पांढरा अंगरखा प्रकारातील कुर्ता, शेला, फेटा आणि पायजमा असा पोशाख केला होता. लग्नातील त्यांचे हे लूक सगळ्यांनाच पसंत पडले.

"22.04.2024॥ कुर्यात सदा मंगलम् ॥" असं कॅप्शन ऋजुताने तिने शेअर केलेल्या फोटोजना दिल आहे. त्यांच्या सेलिब्रिटी मित्रांनी आणि चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत या नवविवाहित जोडीचं अभिनंदन केलं.

पुण्यातील साधना राजेशाही या ठिकाणी मराठमोळ्या थाटात त्यांचं लग्न पार पडलं. चेतनने यावेळी घेतलेल्या उखाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राजश्री मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर चेतनच्या उखाण्याचा व्हिडीओ शेअर केलाय. "ठाण्याचे असतील तलाव फेमस पण नाशिकची आमची नदीच ऋजुताचं नाव घेतो आमचं ठरलं होतं आधीच" असा भन्नाट उखाणा चेतनने घेतला. सोशल मीडियावर त्याच्या या उखाण्याचं कौतुक होतंय.

१९ डिसेंबर २०२२ ला या जोडीने नाशिकमध्ये मित्र-मैत्रीण आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला होता. झी युवावरील फुलपाखरू या मालिकेच्या सेटवर या जोडीची ओळख झाली होती. पुढे मैत्री आणि हळूहळू प्रेम असा प्रवास करत या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऋजुता 'आई माझी काळूबाई' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती आणि आता नवीन प्रोजेक्टमध्ये तिला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

SCROLL FOR NEXT