Do Aur Do Pyaar  esakal
Premier

Do Aur Do Pyaar Trailer: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची गोष्ट; विद्या बालन आणि प्रतीक गांधीच्या ‘दो और दो प्यार’चा ट्रेलर पाहिलात?

Do Aur Do Pyaar Trailer: विद्याच्या 'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

priyanka kulkarni

Do Aur Do Pyaar Trailer: अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्या बऱ्याच काळापासून पडद्यापासून 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar) या तिच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटासाठी चर्चेत आहे. विद्याच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची गोष्ट

'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका विवाहित जोडप्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. विद्या आणि प्रतीक गांधी यांनी या विवाहित जोडप्याची भूमिका साकारली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला विद्या आणि प्रतीक यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं बघायला मिळत आहे. त्यानंतर विद्याचं अफेअर एका परदेशी व्यक्तीसोबत होतं तर प्रतीक गांधीचे इलियाना डिक्रूझसोबत अफेअर होते.

विद्या बालननं शेअर केला ट्रेलर

विद्या बालनने इन्स्टाग्रामवर 'दो और दो प्यार' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरला तिनं कॅप्शन दिलं, “बकल अप, कारण आता 'दो और दो प्यार' सोबत मजा आणि रोमान्स दुप्पट करण्याची वेळ आली आहे!"

पाहा ट्रेलर:

कधी रिलीज होणार चित्रपट?

दो और दो प्यार हा 19 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'दो और दो प्यार' हा प्रेम, हास्य आणि मॉडर्न नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर आधारित असणार आहे. ॲलिपसिस एंटरटेनमेंट प्रॉडक्शन, ॲप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत, 'दो और दो प्यार' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT