Arti Singh Haldi Ceremony
Arti Singh Haldi Ceremony Sakal
Premier

Arti Singh Haldi Ceremony: होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स आणि ढोलवर ठेका; थाटात पार पडली गोविंदाच्या भाचीची हळद

सकाळ डिजिटल टीम

Govinda niece arti singh haldi Haldi Ceremony watch video

गोविंदाची भाची आणि अभिनेत्री आरती सिंग 25 एप्रिलला लग्नबंधनात अडकतेय. नुकताच तिचा हळद समारंभ थाटात पार पडला. सोशल मीडियावर तिच्या हळदीचे फोटोज व्हायरल झाले आहेत.

कुटूंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आरती आणि दीपकचा हळद समारंभ थाटात पार पडला. आरतीने यावेळी रंगीबेरंगी लेहेंगा, फुलांचे दागिने असा लूक केला होता. तर लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दीपक नटला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या परिवारासोबत ढोलवर ठेकाही धरला. तर भाऊ कृष्णासोबत आरतीने धमाल डान्सही केला. तिची वहिनी कश्मिराही फ्युजन साडीमध्ये सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिचा लूक अनेकांना पसंत पडला.

25 एप्रिलला इस्कॉन मंदिरात आरती दीपकसोबत लग्न करणार आहे. ल्हास मित्रमंडळी आणि कुटूंब यांच्या उपस्थितीमध्ये आरतीचं लग्न पार पडणार आहे. आरतीला पहिल्यापासून वाराणसीमधील काशीविश्वेश्वर मंदिरात लग्न करण्याची इच्छा होती पण ते शक्य नसल्यामुळे तिने मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. गोविंदा यांनी देखील तिला फोनवर आशीर्वाद दिल्याचं आरतीने यावेळी सांगितलं आणि ते लग्नाला उपस्थित राहावेत अशी इच्छा व्यक्त केली.

आरतीची बहीण आणि अभिनेत्री रागिणी खन्नासुद्धा तिच्या हळदीला हजर होती तर काही दिवसांपूर्वीच आरतीचा ब्रायदल शॉवरसुद्धा थाटात पार पडला. यावेळी आरतीने केलेला वेस्टर्न लूक सगळ्यांनाच पसंत पडला होता. या कार्यक्रमाला तिच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आरतीचा होणारा नवरा दीपक हा बिझनेसमन असून तो नवी मुंबईत राहतो. त्याची स्वतःची इव्हेंट कंपनी आहे. तर आरतीने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून बिग बॉस सीजन 13 मुळे ती चर्चेत राहिली होती.

शेवटच्या दिवसापर्यंत घरात टिकणाऱ्या फायनलिस्टपैकी ती एक होती. 'मायका' या मालिकेतून आरतीने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. गृहस्थी, परिचय, ससुराल सिमर का या तिच्या मालिका गाजल्या. तर वारीस या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. नुकतीच तिची श्रवणी ही मालिका संपली. या मालिकेत तिने साकारलेली खलनायिका सगळ्यांना आवडली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT