Salman Khan Galaxy : सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर सोडणार? जवळच्या मित्राने दिली मोठी अपडेट

Salman Khan Farmhouse : झूम टीव्ही चॅनेलने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार, सलमान कायमचा पनवेलच्या फार्महाऊसवर शिफ्ट होण्याचा विचार करत आहेत.
Salman Khan Galaxy
Salman Khan GalaxyeSakal

Salman Khan Galaxy Apartment : अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे सगळेच जण हादरले आहेत. या प्रकरणातील आरोपींना जरी पोलिसांनी अटक केली असली, तरी अजूनही सलमानच्या घरी चिंताजनक वातावरण आहे. नुकतंच सलमानने त्याच्या घराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. सलमान लवकरच त्याचं वांद्रे येथील घर सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

झूम टीव्ही चॅनेलने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार, सलमान कायमचा पनवेलच्या फार्महाऊसवर शिफ्ट होण्याचा विचार करत आहेत. झूम टीव्हीला सलमानच्या एका खास मित्राने दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला. तो म्हणाला, "भाई बऱ्याचदा त्यांच्या फार्महाऊसवर असतात. त्यांना तिथे राहणं आवडतं. त्यांच्या बिग बॉसच्या सेटपासून ते लोकेशन खूप जवळ आहे. शहरातील त्यांच्या घराजवळील सुरक्षेला गंभीररीत्या हानी पोहोचली आहे. त्यामुळे भाई आता पनवेलच्या फार्महाऊसवर कायमचं शिफ्ट होण्याचा विचार करत आहेत.." (Salman Khan Panvel Farmhouse)

याबाबत अद्याप सलमानच्या टीमकडून मात्र कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलं नाहीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमान दुबईला एका कार्यक्रमानिमित्त जाऊन आला. त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग देखील लवकरच सुरु होणार आहे. साजिद नादियाडवाला यांच्या आगामी सिकंदर या सिनेमात सलमान काम करतोय.

Salman Khan Galaxy
Salman Khan Bodyguard Salary : सलमान साठी जीव द्यायला तयार असणाऱ्या शेराचा पगार किती? बॉडीगार्ड बनण्याआधी होता मिस्टर महाराष्ट्र

दरम्यान सलमानच्या घरावर हल्ल्या करणाऱ्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तर या हल्ल्याचा प्लॅन आखणाऱ्या कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे. एनआयए आणि अनेक राज्यांच्या पोलिसांनी आतापर्यंत लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली आहे. एनआयएने दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोई तुलना केली आणि याबाबत आरोपपत्रात नोंदवले. एनआयएच्या म्हणण्यानुसार दाऊद इब्राहिमप्रमाणेच लॉरेन्सही कुख्यात गुंड बनला आहे. तो दहशतवादी संघटनांना मदत करू लागला असल्याचं पोलीस तपासात आढळून आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com