honey Singh  sakal
Premier

Honey Singh: तो चांगला आहे पण... सोनाक्षीच्या लग्नात टल्ली झालेल्या हनी सिंगने झहीरला दिली वाॅर्निंग, व्हिडिओ व्हायरल

Honey Singh At Sonakshi Zaheer Wedding: लोकप्रिय गायक हनी सिंग याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Payal Naik

Honey Singh Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडाची लेक सोनाक्षी सिन्हा २३ जून २०२४ रोजी विवाहबद्ध झाली आहे. तिने अभिनेता झहीर इकबाल याच्याशी लग्नगाठ बांधली. सुरुवातीला सोनाक्षीचे वडील म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा, आई आणि भाऊ या लग्नाच्या विरोधात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र सोनाक्षीच्या माहेरचे सगळेच या लग्नासाठी हजर राहिले. त्यामुळे या चर्चांवर पडदा पडला. दुसरीकडे या लग्नाला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. लोकप्रिय गायक यो यो हनी सिंग यानेही या लग्नाला हजेरी लावली. लग्नात हनी सिंग दारू पिऊन टल्ली झाला होता. त्यातच त्याचा सोनाक्षीच्या नवऱ्याला वॉर्निंग देतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाला सायरा बानू, अनिल कपूर, संजिदा शेख यांच्यापासून काजोल असे अनेक कलाकार आले होते. या लग्नाला सोनाक्षीचा जवळचा मित्र हनी सिंग देखील आला होता. आपल्या मैत्रिणीच्या लग्नात त्याने मद्यपान केलं होतं. त्यानंतरचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत हनी सिंग म्हणतोय, 'आज मी एवढा खुश होतो. मी दीड वर्षांपासून दारू प्यायली नाहीये. पण आज मी खूप प्यायलोय. खूप. माझ्या आईने हा व्हिडिओ पाहिला तर खूप शिव्या पडतील पण मी आज खूप दारू प्यायलोय.'

पुढे हनी सिंग म्हणाला, 'मी एवढा आनंदी आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे आज. मी खूप आनंदी आहे. तिला एक उत्कृष्ट मुलगा मिळाला आहे, झहीर हा खूप चांगला मुलगा आहे, प्रेमळ मुलगा आहे. मी त्याला तीन वर्षांपूर्वी भेटलेलो. मला आशा आहे की तो तिला खूप आनंदात ठेवेल. तसं झालं नाही तर आम्ही त्याला बघून घेऊ.' हनी सिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ रात्री दीड वाजता शूट केलेला आहे. यासोबतच सोशल मीडियावर सोनाक्षीच्या लग्नातील आऊटफिटचीही प्रचंड चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT