Bigg Boss Marathi Season 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 : 'मराठी माणसाला मान नाही तर घरात स्थान नाही', रितेशने दाखवली निक्कीला जागा

Riteish Deshmukh demands apology from Nikki : बिग बॉस मराठी सीजन ५ च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने निक्की तांबोळीची खरडपट्टी काढली.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ चांगलाच गाजतोय. आज बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये पहिल्यांदाच रितेश सदस्यांची शाळा घेणार आहे. आज पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीची खरडपट्टी काढली. सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. 'बिग बॉस मराठी'च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. निक्कीचे मुद्दे बरोबर असले तरीही तिने वापरलेली भाषा आणि सदस्यांचा केलेला अपमान यामुळे अनेकांना तिचं वागणं खटकलं आहे. रितेश भाऊ त्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर तिचा माज उतरवणार असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं.

निक्की तांबोळी 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,"वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय.

बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार" असं म्हणत रितेशने निक्कीला चांगलेच खडेबोल सुनावले.

आता रितेश निक्कीला तिच्या इतर वागण्यावरूनही झापणार कि तिची बाजू घेणार ? घरातून कोणता सदस्य बाहेर पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: मुंबईत भरतीचा इशारा; अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT