vitthal rukmini
vitthal rukmini sakal
Premier

Indrayani Colors Marathi Serial : ‘इंद्रायणी’ कार्यक्रमाची टीम पुण्यात विठु-माऊलीच्या चरणी

सकाळ वृत्तसेवा

Indrayani Colors Marathi Serial : सालस तरीही खोडकर अशी ‘इंदू’ आपण सर्वांनीच प्रोमोमधून पाहिली. मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण पाहिले. तिचे मार्मिक प्रश्न मोठ्यामोठ्यांना अचंबित करणारे आहेत.

तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत, अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू आख्या गावाची म्हणजेच विठूच्या वाडीची लाडकी आहे. लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच ‘इंद्रायणी’ आपल्या भेटीला येणार आहे.

२५ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता 'इंद्रायणी' आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.तत्पूर्वी ‘इंद्रायणी’ मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि आरती केली.

या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळखही करून देण्यात आली. ‘इंदू’ कोण आहे, तिचे आई-वडील कोण आहेत, तिचे जग कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजनही यावेळी करण्यात आले. यावेळी 'इंदू'ची भूमिका साकारणारी सांची भोईर, अनिता दाते, संदीप पाठक स्वानंद बर्वे, आयुष उलगड्डे, राघव घाडगे यांच्यासह दिग्दर्शक विनोद लव्हेकर उपस्थित होते. दिग्दर्शक आणि कलावंतांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.

हल्ली आपल्याला सगळी उत्तरे सहज सापडण्याच्या काळात आपल्याला प्रश्न पडणेच संपलेय… त्‍यामुळे माणसाचे माणूस म्हणून घडणेही खुंटत चालले आहे. अशा या गतिशील, यंत्रयुगात मुलांचे निरागसपण जोपासणारी, त्यांची माणूस म्हणून जडणघडण करणारी मालिका विनोद लव्हेकर या संवेदनशील दिग्दर्शकाने आणि तितकाच चिंतनशील लेखक चिन्मय मांडलेकरने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT