Malaika Arora esakal
Premier

Malaika Arora: गर्लफ्रेंड अन् व्हर्जिनिटी; मलायकानं लेकाला विचारले हटके प्रश्न, काय म्हणाला अरहान?

Malaika Arora: मलायकानं अरहानला त्याच्या गर्लफ्रेंड्सबद्दल तसेच व्हर्जिनिटीबद्दल प्रश्न विचारले. मलायकाच्या या हटके प्रश्नांना अरहाननं मजेशीर पद्धतीनं उत्तर दिलं आहे.

priyanka kulkarni

Malaika Arora: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरानं (Malaika Arora) मुलगा अरहान खानच्या (Arhaan khan) 'डंब बिर्याणी' नावाच्या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये मलायका आणि अरहाननं एकमेकांना हटके प्रश्न विचारले आहेत. अरहाननं मलायकाला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला तर मलायकानं अरहानला त्याच्या गर्लफ्रेंड्सबद्दल तसेच व्हर्जिनिटीबद्दल प्रश्न विचारले. मलायकाच्या या हटके प्रश्नांना अरहाननं मजेशीर पद्धतीनं उत्तर दिलं आहे.

'डंब बिर्याणी' या युट्यूब चॅनलच्या शोमध्ये मलायका आणि अरहान यांनी एकमेकांना बरेच प्रश्न विचारले. या प्रश्नांना जर मलायका आणि अरहान हे उत्तर देऊ शकले नाही, तर त्यांना मिरची खावी लागणार, असा या कार्यक्रमाचा नियम होता. मलायकानं अरहानला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. यापैकी काही प्रश्नांची उत्तरं अरहान देऊ शकला नाही, त्यामुळे त्याला मिरची खावी लागली.

मलायकानं अरहानला विचारले, "व्हर्जिनिटी कधी गमावलीस?" मलायकाच्या या प्रश्नाचं उत्तर अरहान देऊ शकला नाही. तो म्हणाला, "मला तुला हे सांगायचं नाहीये"

मलायकानं अरहानच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल विचारला प्रश्न

शोमध्ये अरहाननं मलायकाला प्रश्न विचारला,"माझ्या एक्स गर्लफ्रेंड्स कोणती मुलगी तुला आवडत नाही?" याचं मलायका उत्तर देते, "मला त्यांची नावं माहित नाही, मला त्यांच्याबद्दल फार काही माहिती नाहीये, त्यांची नावं फार वेगळी आहेत. एकीचं नाव हेतल आहे का?" मलायकाचं हे उत्तर ऐकून अरहान हसतो. "तुझी सध्याची गर्लफ्रेंड सिच्युएशन काय आहे?", असाही प्रश्न मलायका विचारते. याचं अरहान उत्तर देतो, "ब्रेक"

मलायका आणि अरबाज हे 2017 मध्ये विभक्त झाले. अरबाजनं गेल्या वर्षी शुरा खान या मेकअप आर्टिस्टसोबत लग्न केलं आहे. तर मलायका ही सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन यांना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. तसेच मलायका आणि अर्जुन हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar: ''पार्थ पवारांवर अजून गुन्हा का दाखल नाही?'', हायकोर्टाने स्वतःहून विचारलं; ''हे तेच का उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव..''

IPL 2026 Auction: ३०००+ धावा अन् १०० + विकेट्स! ऑल-राऊंडरसाठी Mumbai Indians जोर लावणार; कोण आहे विरनदीप सिंग?

Jio University: महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात रिलायन्सचे 'जियो विद्यापीठ' सुरू होणार, पण कधी अन् कसे? जाणून घ्या...

Unusual Marriage Ritual : अजब प्रथा! लग्नावेळी घोडीवर बसण्याआधी नवरदेवाला आई करते स्तनपान

Electric Vehicle Toll: वाहनचालकांना मोठा दिलासा! भरलेला टोल आता परत मिळणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT