Manasi Naik Pardeep Kharera: लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिच्या अभिनयासोबतच तिचं वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलं. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र तिच्या वक्तव्यांमुळे आणि लग्नामुळे तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. एकीकडे मानसीच्या ''बिग बॉस मराठी ५' मध्ये दिसणार असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे मानसीचा पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेरा पुन्हा एकदा बोहोल्यावर चढायला सज्ज झाला आहे. त्याचा साखरपुडाही पार पडला आहे. त्याने त्याच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता चाहते ती मुलगी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
मानसीने १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीपशी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. मात्र अवघ्या वर्षभरात त्यांचं नातं तुटलं. त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या वेळेस दोघांनीही एकमेकांवर आरोप केले होते. मात्र आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी मानसीने तिने तिचा राजकुमार भेटल्याचं सांगत एक पोस्ट केली होती. आता प्रदीपला देखील नवीन जोडीदार मिळाली आहे. त्याने दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे. थाटामाटात साखरपुडा करत त्याने व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं, 'अखेर मी बंधनात अडकलो. आम्ही हे करून दाखवलं.
प्रदीपने सोशल मीडिया स्टार असणारी विशाखा पंवार हिच्याशी साखरपुडा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रदीप आणि विशाखा डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांचे विविध व्हिडिओही व्हायरल झाले होते. याशिवाय त्यांनी एकत्र म्युझिक अल्बमही केला आहे. एकत्र काम केल्यानंतर आता त्यांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे. या साखरपुड्याच्या व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.