mitali mayekar  esakal
Premier

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Mitali Mayekar Post On Suraj Chavan Win BB Marathi 5: लोकप्रिय मराठी रीलस्टार सुरज चव्हाण हा 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता ठरला आहे. मात्र मितालीची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' चा ग्रँड फिनाले आज ६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. लोकप्रिय मराठी रीलस्टार सुरज चव्हाण हा 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता ठरला. गावाकडून आलेल्या सुरजने 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्याला संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड पाठिंबा दिला. अभिजीत सावंतला या शोमध्ये दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सध्या सगळ्या चाहत्यांकडून सुरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र अशातच अभिनेत्री मिताली मयेकर हिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ज्याचा संबंध नेटकरी थेट 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सुरज चव्हाण याच्याशी जोडत आहे. असं का म्हणाली आहे मिताली?

मिताली मयेकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मिताली कायम सोशल मीडियावर सक्रीय असत. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर तिची मतं मांडताना देखील दिसते. मात्र आता तिने शेअर केलेली एक स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिने थेट सुरजच्या बिग बॉस मराठीचा हा सीझन जिंकण्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. मितालीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिलं, 'रिऍलिटी शो की सिंपथी शो?' यासोबत तोंडाला चैन असलेला ईमोजी देखील शेअर केला आहे. यातून तिने हा शो रिऍलिटी शो होता की दया दाखवणारा शो होता असा प्रश्न विचारला आहे. तिने एकूणच सुरज च्या शो जिंकण्यावर प्रश्न विचारला आहे असं नेटकरी म्हणत आहेत.

mitali mayekar post

तिच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यानी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं, 'आज पहिल्यांदा मितालीने बरोबर प्रश्न विचारलाय. सुरज खरंच जिंकायला हवा होता का? त्याला फक्त लोकांनी त्याच्या परिस्थितीमुळे वोट केलंय.' तर दुसऱ्या नेटकऱ्याने तिच्या विरोधात लिहिलं, 'त्याला जनतेने वोट करून जिंकवलंय. तुम्हाला का एवढा त्रास होतोय.' मितालीच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांमध्ये मात्र चांगलीच जुंपली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT