Panchayat 3 sakal
Premier

Panchayat 3: स्वप्नांना वय नसतं! गंभीर आजार जडला, तरीही हार मानली नाही; 'पंचायत'मधील अम्माजींचा प्रेरणादायी प्रवास

Abha Sharma: आभा यांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच संकटांचा सामना केला.

priyanka kulkarni

Panchayat 3: पंचायत-3 (Panchayat 3) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक झालं. अशातच या वेब सीरिजमधील अम्मा-जी या व्यक्तीरेखेच्या अभिनयाची आणि कॉमेडी अंदाजाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. 75 वर्षांच्या अभिनेत्री आभा शर्मा यांनी पंचायत-3 या वेब सीरिजमधील अम्माजी ही भूमिका साकारली आहे. आभा शर्मा यांना जरी पंचायत-3 या वेब सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली असली तरी याआधी देखील त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेक कलाकार त्यांचे मनोरंजनक्षेत्रातील करिअरची सुरुवात वयाच्या 20 ते 30 वर्षादरम्यान करतात. मात्र आभा यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास वयाच्या 54 व्या वर्षी सुरुवात केली. आभा यांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच संकटांचा सामना केला. त्यांचा अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. जाणून घेऊयात आभा शर्मा यांच्याबद्दल...

लहानपणापासूनच अभिनयाची आवड, पण...

नुकत्याच एका मुलाखतीत आभा शर्मा यांनी सांगितलं, “मला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायची इच्छा होतं. पण माझ्या मी चित्रपटसृष्टीत काम करावं, असं वाटत नव्हतं. तिला हा व्यवसाय आवडला नाही. मला तिच्या इच्छेविरुद्ध काम करायचं नव्हतं. माझ्या आईच्या निधनानंतर मी अभिनयक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा मला माझ्या भावंडांचा पाठिंबा मिळाला.”

आभा यांना एक मोठी बहीण आणि भाऊ होते. आभा यांचे वडील दूरसंचार कंपनीत काम करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर आभा शर्मा या त्यांच्या आजारी आईची काळजी घेऊ लागल्या. त्यांनी लग्न देखील केले नाही. आभा यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून डिप्लोमा पदवी मिळवल्यानंतर १९७९ मध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

सर्व दात पडले, दुर्मिळ आजार झाला, पण हार मानली नाही

आभा यांना वयाच्या 35 व्या वर्षी हिरड्यांमध्ये इंफेक्शन झाले. त्यामुळे त्यांचे सर्व दात पडले. त्यानंतर वयाच्या 45 व्या वर्षी आभा यांना एक दुर्मिळ आजार झाला. ज्यामुळे त्यांचे हातपाय थरथर कापू लागले.

आभा यांनी 1991 मध्ये त्यांनी शिक्षकी पेशा सोडला. 2008 मध्ये आभा यांनी लखनऊमध्ये थिएटर करण्यास सुरुवात केली. यावरुन असं कळते की, स्वप्नांना वय नसते. आभा यांनी पंचायत-3 या वेब सीरिजसोबतच इशाकजादे या चित्रपटामध्ये देखील काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT