ratan tata esakal
Premier

अमिताभ किंवा सिमी गरेवाल नाही तर महाभारतातील 'हा' अभिनेता होता रतन टाटा यांचा जवळचा मित्र; एकाच हॉस्टेलमध्ये राहायचे दोघे

Ratan Tata Close Friend From Bollywood : हा अभिनेता एकमेव होता ज्याला रतन टाटा त्यांच्या हॉस्टेलवरच्या रूममध्ये बोलवायचे. त्यांनी तेव्हाच्या खास आठवणी सांगितल्या आहेत.

Payal Naik

भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचं ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात एकच शोकाची लाट आली. अनेक बॉलिवूड आणि मराठी कलाकारांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने प्रत्येक देशवासियाच्या डोळ्यात पाणी होतं. मात्र त्यांच्या जवळच्या मित्रांची संख्या तशी कमीच होती. टाटा हे मितभाषी होते मात्र बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता त्यांचा खूप चांगला मित्र होता. ते दोघे एकाच हॉस्टेलमध्ये राहायचे आणि मुख्य म्हणजे ते एकमेव होते ज्यांना रतन टाटा त्यांच्या हॉस्टेलमधल्या खोलीत येऊ द्यायचे. कोण आहे हा अभिनेता?

हे अभिनेता दुसरे तिसरे कुणी नसून गुफी पेंटल आहेत. 'महाभारतात' शकुनी मामाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे गुफी यांनी रतन टाटा यांच्यासोबत इंजिनिअरिंग केली आहे. आता गुफी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितलेत. यात ते म्हणतात, 'सर रतन टाटा, मी 1960 बद्दल बोलतोय, जेव्हा मी टाटा इंजिनियरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी, जमशेदपूर, टाटा नगर इथे अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होतो. मी टेल्कोमध्ये असलेल्या डीलर्स हॉस्टेल नावाच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो. तिथे माझा रूम नंबर 22 होता. अमेरिकेतील नासा येथून प्रशिक्षण पूर्ण करून रतन टाटा त्यावेळी थेट आले होते. ते माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठे होते. त्याच वसतिगृहातील रुम क्रमांक १ मध्ये ते राहत होते.'

ते पुढे म्हणाले, 'ते एक जेंटलमन होते. याचा अर्थ ते ज्या कुटुंबातील आहे त्याचा आदर... ते उद्याचे, आजच्या टाटा कंपनीचे प्रमुख होते. आणि मला खूप अभिमान वाटतो. भारतीय असल्याने आणि मित्र म्हणूनही. मला त्याह बोलणं आठवतं. ते आम्हाला सहलीला त्यांच्या गाडीत घेऊन जायचे. त्यांची माझ्याशी खूप घट्ट मैत्री होती. मी तिथे एकटाच विद्यार्थी होतो ज्याला ते त्यांच्या खोलीत बोलावून माझ्याशी खूप बोलत असत. त्यावेळी त्यांच्याकडे सिल्व्हर कलरची प्लायमाउथ कन्व्हर्टिबल कार होती, ती अतिशय सुंदर होती आणि तिथे हाय-फाय सिस्टीमचा रेडिओही होता जो आम्ही पहिल्यांदाच बघितला होता. त्याकाळी गाडीमध्ये रेडिओ असणं ही एक नवल, नवीन गोष्ट होती. त्यामुळे आम्ही इंग्रजी आणि हिंदी गाणी ऐकायचो. आणि कधी कधी बिनाका गीतमाला पण असायची.

पेंटल आठवण सांगत म्हणाले, 'मला आठवतंय माझी आई मला भेटायला आली होती. तेव्हा रतन यांनी त्यांच्या गाडीची चावी माझ्या हातात दिली होती आणि म्हणाले जा यार गुफी आईला जमशेदपूर फिरवून आण. डिमना तलाव दाखव, जुबली पार्क दाखव. ते खूप दिलदार होते.' गुफी यांनी या व्हिडिओमध्ये त्यांच्या इतरही आठवणी सांगितल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT