Paaru Esakal
Premier

Zee Marathi Serial : पारू मालिकेत होणार अहिल्यादेवींच्या भावाची एंट्री , 'या' दिग्गज अभिनेत्याचा कमबॅक

Paaru Serial Latest Update : झी मराठीवरील पारू ही मालिका खूप चर्चेत आहे. पारू मालिकेत लवकरच एका दिग्गज अभिनेत्याची एंट्री होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Marathi Entertainment News : झी मराठीवरील पारू ही मालिका त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत असते. पारू या मालिकेत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल. रक्षाबंधनचा सण जवळ आला आहे आणि यानिमित्त मालिकेमध्येही आता रंजक वळण येणार आहे. पारू मालिकेत नवीन कलाकाराची एंट्री होणार आहे.

नुकताच झी मराठी वाहिनीवर मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये मालिकेतील आगामी ट्विस्टची झलक पाहायला मिळाली. मराठी इंडस्ट्रीमधील चिरतरुण म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुनील बर्वे पारू मालिकेतून बऱ्याच काळाने झी मराठीवर कमबॅक करत आहे.

झी मराठीच्या सोशल मीडिया प्रोमोमध्ये शेअर करण्यात आलं कि, अहिल्यादेवी एका पाकिटात राखी पाठवतात तेव्हा त्यांचा नवरा तिला तू अजूनही राखी पाठवतेस असं विचारतात तेव्हा त्या एक दिवस माझ्या भावापर्यंत राखी नक्की पोहोचेल असं म्हणातात. तेव्हा अहिल्यादेवींनी पाठवलेलं राखीच पाकीट पोहोचतं आणि त्यांचा भाऊ ते पाकीट उघडूनही न बघता एका पेटीत ठेवून देतो आणि नंतर अहिल्या देवींच्या जुन्या फोटोकडे बघतो असं दाखवण्यात आलं आहे. अहिल्यादेवी आणि त्यांच्या भावामध्ये काहीतरी वाद आहे असं या प्रोमोमधून समजतंय.

अभिनेता सुनील बर्वे एका शेतकऱ्याच्या भूमिकेत या मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रोमोमधील त्याचा लूक सगळ्यांनाच पसंत पडला. सहकुटूंब सहपरिवार या स्टार प्रवाहवरील मालिकेत त्यांनी अखेरचं काम केलं होतं. त्यानंतर बऱ्याच काळाने ते पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अहिल्यादेवी आणि त्यांच्या मोठ्या भावाचं नातं आता या मालिकेत उलगडणार आहे.

अहिल्यादेवी आणि त्यांच्या मोठ्या भावातील दुरावा मिटेल का ? मालिकेत आता काय घडणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या आगामी भागात मिळतील तेव्हा पाहायला विसरू नका पारू १ ९ ऑगस्टला रात्री ७ :३ ० वाजता फक्त झी मराठीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT