Shivani Sonar Lovestory Esakal
Premier

Shivani Sonar : शॉर्ट फिल्मने बना दी जोडी ; शिवानी-अंबरची भन्नाट लव्हस्टोरी

Shivani Sonar & Ambar Ganpule Love story : मराठी टेलिव्हिजनवरील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच अंबर गणपुलेशी लग्न करणार आहे. जाणून घेऊया त्यांची भन्नाट लव्हस्टोरी.

सकाळ डिजिटल टीम

Shivani Sonar & Ambar Ganpule : 'राजा रानीची गं जोडी' या कलर्स मराठीवरील मालिकेतून शिवानी सोनार घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली संजू सगळ्यांनाच आवडली. तर अभिनेता अंबर गणपुलेने रंग माझा वेगळा या मालिकेत काम केलं होतं. शिवानी आणि अंबरने काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा केला. त्यांच्या या सरप्राईज साखरपुड्याच्या सगळेच चकित झाले.

शिवानी आणि अंबरची लव्हस्टोरी कधी आणि कशी सुरु झाली ? असा प्रश्न अगदी शिवानीच्या चाहत्यांनाही पडला होता. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवानीने तिची आणि अंबरची लव्हस्टोरी शेअर केली.

शिवानीने मुलाखतीमध्ये सांगितलं कि, ते दोघेही पुण्याचे आहेत. राजा रानी ही शिवानीची मालिका संपल्यानंतर ती पुण्यात परत आली आणि त्याचवेळेस रंग माझा वेगळाच शूटिंग संपल्यामुळे अंबर पुण्यात होता. ते दोघेही एकमेकांना ओळखत होते पण चांगले मित्र नव्हते. शिवानी आणि अंबरचा एक कॉमन मित्र आहे पराग जो देखील फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तर परागला एक शॉर्ट फिल्म बनवायची होती आणि शॉर्ट फिल्मसाठी त्याने या दोघांना कास्ट केलं.

या फिल्मच्या रिडींग दरम्यान या दोघांची मैत्री झाली,जवळीक वाढली आणि एकमेकांना ते आवडू लागले. ती शॉर्ट फिल्म तर बनली नाही पण अंबर आणि शिवानीची जोडी जमली. त्यानंतर अंबरने तिला प्रपोज केलं ते डेट करू लागले पण त्यांनी ही गोष्ट सोशल मीडियावर कधीच शेअर नाही केली. त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि घरच्यांना याबद्दल कल्पना होती. त्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांचं नातं जाहीर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपण साखरपुडा उरकूनच नातं जाहीर करू असं त्यांनी ठरवलं आणि एप्रिलमध्ये या जोडीने साखरपुडा केला.

शिवानीने आतापर्यंत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची महागाथा','राजा रानीची गं जोडी','सिंधुताई माझी माई' या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तिची सोनी मराठीवर सुरु असलेली 'तू भेटशी नव्याने' ही मालिका खूप गाजतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: पावसाचा हाहाकार! पुढील 5 दिवस काळजीचे... या जिल्ह्यांना रेड अलर्ट! मुंबई-पुण्याची परिस्थिती कशी असेल?

PM मोदी जगातले सर्वात लोकप्रिय नेते; ट्रम्प अन् मेलोनींच्या रँकिंगमध्ये घसरण; कोण कितव्या स्थानी?

Child End Of Life : शाळा का चुकवतोस आईनं विचारलं, मुलाने थेट गळफासचं घेतला; नेमकं काय चुकलं

Latest Maharashtra News Updates : कऱ्हाडजवळ आजपासून महामार्गावर एकेरी वाहतूक, उड्डाणपुलाचे गर्डर उतरविण्यासाठी नियोजन

Latur Crime: ‘एचआयव्ही’बाधित मुलीवर अत्याचार; चार महिन्यांनी गर्भपाताचा आरोप, सहा संशयितांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT