suraj chavan  esakal
Premier

सुरज चव्हाण जिंकताच गावात झाला एकच कल्ला! 'गुलीगत पॅटर्न' वर थिरकले गावकरी, व्हिडिओ होतोय व्हायरल

Suraj Chavan Friends Celebration After He Won BB Marathi 5: गुलीगत धोका फेम सुरज चव्हाण याच्या गावातून एक व्हिडिओ समोर येतोय ज्यात सगळा गाव गुलालाने न्हाऊन निघाला आहे.

Payal Naik

Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan Celebration with Friends: बुक्कीत टेंगुळ फेम सुरज चव्हाण याने 'बिग बॉस मराठी ५'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सुरजने आपल्या वागण्याने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून वोटिंग झालं. महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमाच्या जोरावर सुरज थेट अंतिम फेरीत पोहोचला. आणि त्याने ट्रॉफी आपल्या नावावर केली. ट्रॉफी आता बारामतीला जाणार आहे. आता त्याच्या गावातून एक व्हिडिओ समोर येतो आहे ज्यात त्याच्या गावातले गावकरी सुरज जिंकल्याच्या आनंदात भरभरून गुलालाची उधळण करत आहेत आणि गुलीगत धोका या गाण्यावर नाचत आहेत. सुरजने स्वतः हा व्हिडिओ शेअर केला आहे.

suraj chavan

रीलस्टार सूरज चव्हाण हा त्याच्या रिल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. बारामतीजवळील मोढवे गावातील सूरज हा टीव्हीवर दिसला आणि चक्क महाविजेता ठरला. त्याच्या विजयानंतर गावात आनंदाची एकच लाट आली आहे. त्याच्या गावातील सगळेच आपला आनंद व्यक्त करत आहेत. सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या मोढवे गावातील आहे. सूरजने हा शो जिंकल्यावर गावातील लोक आणि सूरजचे मित्र ‘गुलीगत पॅटर्न’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. व्हिडिओत खूप गर्दी पाहायला मिळतेय आणि गुलालाची उधळण करून सगळे नाचत आहेत. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

suraj chavan

सुरजने हा शो जिंकल्यावर त्याच्यावर नेटकऱ्यांकडून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केवळ कलाकारच नाही तर राजकारणी मंडळी देखील सुरजचं कौतुक करत आहेत. हा शो जिंकताच केदार शिंदे यांनी सुरजला घेऊन एक चित्रपट काढणार असल्याची घोषणा केली आहे. 'झापून झुपुक' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT