Viral Vada Pav Girl esakal
Premier

Viral Vada Pav Girl: हाणामारी, शिव्या अन् धमक्या; व्हायरल वडापाव गर्लचं रस्त्यावर जोरदार भांडण,पाहा व्हिडीओ

Viral Vada Pav Girl: वडापाव गर्लचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वडापाव गर्ल ही रस्त्यावरील लोकांबरोबर भांडण करताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Viral Vada Pav Girl: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत (Delhi) वडापाव (Viral Vada Pav) विकणाऱ्या एका मुलीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. चंद्रिका गेरा दीक्षित असं या मुलीचं नाव आहे. चंद्रिका ही वडापाव गर्ल या नावानं सध्या ओळखली जात आहे. सोशल मीडियावर चंद्रिकाची मोठी फॅन फॉलोइंग आहे. या वडापाव गर्लचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता वडापाव गर्लचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वडापाव गर्ल ही रस्त्यावरील लोकांबरोबर भांडण करताना दिसत आहे.

हाणामारी, शिव्या अन् धमक्या

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वडापाव गर्लसोबत काही लोक धक्काबुक्की करताना दिसत आहेत. गर्दीतील एक महिला ही वडापाव गर्लवर ओरडताना दिसत आहे. तसेच रस्त्यावरील काही माणसं वडापाव गर्लचं हे भांडण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करताना दिसत आहे. वडापावल गर्ल आणि रस्त्यावरील लोकांमध्ये का भांडण झालं? हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण या भांडणाचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

वडापाव गर्लच्या भांडणाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "हे दिल्लीमध्ये काय सुरु आहे" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "तिला बिग बॉसमध्ये पाठवा."

पाहा व्हिडीओ:

जाणून घ्या वडापाव गर्ल चंद्रिकाबद्दल...

चंद्रिका मूळची इंदूरची आहे. दिल्लीत चंद्रिकाचा 'मुंबई का मशहूर वडापाव' नावाचा वडापावचा स्टॉल आहे. चंद्रिकाच्या या स्टॉलसमोर वडापाव खाण्यासाठी खवय्यांची नेहमी गर्दी होत असते. चंद्रिका तिच्या वडापावच्या स्टॉलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 297K फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT