Routine Break
Routine Break esakal
प्रीमियम ग्लोबल

Routine Break : स्वतःला वेळ देणं स्वार्थीपणा नाही; रुटीनमधल्या कामातून ब्रेक हवाच!

Shraddha Kolekar

मुंबई : कोणताही एखादा पॅटर्न तयार झाला की तो ब्रेक करत नवीन पॅटर्न तयार करायला हवा असे तज्ज्ञ सांगतात.. जेव्हा आपल्या रुटीनचाही एखादा पॅटर्न तयार होतो तेव्हा तो ब्रेक करत स्वतःलाही ब्रेक देणे गरजेचे होते.

तेच ते नेहमीचे काम करत असताना अनेकांना स्टॅग्नन्सी येते. एका लेव्हलला तर तुम्हाला पुढे विचारच करता येत नाही इतका तुमचा मेंदू थकलेला दिसतो.

असे का होते? मेंदू (Brain) एवढा का थकतो? भीती (anxiety) थकवा (fatigue), टेन्शन (Tension), कंटाळा, स्ट्रेस (stress) आणि त्याच त्या रुटीनचा खरंच काही संबंध असतो का? आणि काय केल्याने हे कमी होऊ शकते?

याबाबत मानसोपचार तज्ज्ञ (psychologist) स्वप्नील पांगे (Swapnil Pange) सांगतात..

१) तुमच्या मेंदूला, शरीराला, मनाला ब्रेक का हवा असतो?

कुठलंही काम करत असताना प्रत्येकाच्या मेंदूची नैसर्गिक क्षमता असते. ठराविक काळ काम केल्यानंतर आपले नैसर्गिक ऊर्जा देणारे घटकांमध्ये काहीशी झीज होते.

तसेच तेच तेच काम केल्याने शरीर आणि मनाला एक प्रकारे स्टॅग्नन्सी येते आणि त्यातून मन आणि शरीर थकायला सुरुवात होते.

त्यातून शरीर आणि मन यांची स्वतःची एक लय तयार झालेली असते तिचा समतोल बिघडलायला सुरुवात होते. यातून कल्पकता कमी होते, कामाची उत्पादकता घटते. कितीही आवडीचे काम असेल तरी ते करण्याची इच्छा राहत नाही.

हा समतोल पुन्हा साधण्याची गरज शरीराला आणि मनाला भासायला लागते आणि त्यासाठी त्यातून बाहेर पडणे आवश्यक वाटते.. याला आपण ब्रेक म्हणतो..

२) मनाला आणि शरीराला खरोखरच ब्रेक हवा असतो की मला ब्रेक हवा आहे असे वाटणे देखील मानसिक असते? असे असेल तर पूर्वीच्या लोकांना असा ब्रेक का तितका आवश्यक का वाटत नव्हता?

साधारण तीस वर्षांपूर्वीचा जरी आपण विचार केला तरी त्या काळातले कामाचे तास (working hours) आणि आताचे कामाचे तास यात खूप मोठा फरक झाला आहे.

पूर्वी कामाची पद्धत ही केवळ सूर्य उगवून तो मावळेपर्यंत होती. तेव्हाचा काळ हा एवढा जास्त 'डिमांडिंग' (Demanding) नव्हता.

आता प्रत्येकच गोष्ट 'सेन्स ऑफ अर्जन्सी' (Sens of urgency ) म्हणून पाहिली जाते. त्यामुळे प्रेशर वाढतो, अनेक तास सतत काम केल्याने कामातून ब्रेक लागतोच. ब्रेक काय तर या पासून लांब जाणे. हेच हेरून ट्रॅव्हल कंपन्या देखील फायदा घेत असतीलही.

पण ब्रेक हवा असणे हे मानसिक नाही कारण जगण्याची पद्धत, कामाची पद्धत बदलली आहे. पूर्वी जो रोजच्या रोज कुटुंबाला, स्वतःला वेळ दिला जात असे तो आज किती जणांना तेवढ्याच प्रमाणात देणे शक्य आहे?

३) कुठे जाऊन हा स्ट्रेस कमी करता येतो? केवळ फिरायला जाण्याने हा स्ट्रेस कमी होतो का?

जशी प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे तशी तिची 'स्ट्रेस रिव्हील' (stress revel) करण्याची पद्धत देखील वेगळी आहे. अनेक लोकं फिरायला जाऊन स्ट्रेस रिव्हील करतायेत म्हणजे माझाही तसाच होईल असे नाही.

काही जण सुटीच्या दिवशी दिवसभर घरात वेळ घालवतात, काही जण नातेवाईकांना भेटतात. प्रत्येकाने हे शोधायला हवं. मी स्वतः गाणं आणि तबला शिकतोय.. कोणत्याही स्पर्धेसाठी नाही. माझ्या आनंदासाठी.

(latest Marathi news about mental health and stress management )

४) स्ट्रेस कमी होतो म्हणजे नेमके कोणते मानसिक बदल आपल्यात होत असतात?

मुळात कामातला स्ट्रेस म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला हवे. कामाचे तास वाढले, पैसे जास्त दिले गेले की अर्थात कामाची मागणी देखील वाढते..

प्रत्येक वेळी मेंदूला त्या मागणीनुसार पुरवठा करावा लागतो आणि तो पुरवठा करण्याची क्षमता कधीकधी संपली तरीही येणाऱ्या मागणीला पुरवठा करणं भाग होतं आणि मग मेंदू, मनाचं आणि शरीराचं गणित बिघडतं.

मेंदूमधील केमिकलची पातळी कमी अधिक होऊन त्याचे मनावर शरीरावर परिणाम होतात. यामुळे राग, चिडचिड होऊन कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. ब्रेकच्या काळात तुम्ही काय ऍक्टिव्हिटी (activity) करता त्यातून स्ट्रेस कमी होतो की नाही हे ठरतं.

ज्याप्रमाणे गाडी थंड करण्यासाठी इंजिन थंड करावं लागतं त्याप्रमाणे मेंदूचं रेस्टोरेशन करण्यासाठी, बॅलन्स साधण्यासाठी तुम्हाला दुसरं काहीतरी आवडीचं काम करावं लागतं ज्यातून आनंद मिळेल, मेंदूला ऊर्जा मिळेल आणि शरीर आणि मनाचा थकवा जाईल तेव्हा तो ब्रेक देखील तुम्हाला मिळाला असे म्हणता येईल.

(what is the psychology of routine break? )

५) मानसिक स्ट्रेसमधून बाहेर आल्यावर नेमके काय परिणाम होतात? थोडक्यात 'ब्रेक के बाद' काय फरक जाणवतात?

शरीरातील ऊर्जा कमी जास्त झालेली असते ती पुन्हा जेव्हा 'बॅलन्सिंग मोड' (Balancing Mode) वर आलेली असते तेव्हा शरीर आणि मन (body and mind) हे दोन्ही शांत झालेले असतात.

आपले शरीर हे एका लयीत चालत असतं. जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा ही लय बिघडते. आणि ब्रेक घेऊन आल्यावर पुन्हा एकदा ती जागेवर आलेली असते.

अश्या वेळी जास्त चांगले लक्ष देऊन काम करू शकता त्यामुळे अर्थातच कामातली उत्पादकता वाढते, चुका टाळता येतात, कल्पकता (creativity) वाढते. भूक, झोप चांगली सुधारते. एकुणातच तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने त्याच गोष्टींकडे पाहणे शक्य होते.

--------------

(Need a Routine Break?)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT