AI and Human
AI and Human Esakal
प्रीमियम ग्लोबल

Generative AI च्या सतत बदलत्या नोकरीच्या काळात ही पाच कौशल्य तुम्हाला काळासोबत राहण्यासाठी मदत करतील

Shraddha Kolekar

मुंबई: चॅट जीपीटी, गुगल जेमिनी आल्यानंतर आता आमच्या नोकऱ्या घेऊन जाणार हा विचार सोडून या 'जनरेटिव्ह एआय' च्या काळात जिथे नोकऱ्या सातत्याने बदलत आहेत तिथे आपण स्वतःला कसे काळासोबत ठेऊ हा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वाधिक परिणाम हा 'ब्लु कॉलर' जॉब्ज वर होणार आहे असे काही अभ्यास सांगतात.

'आर्टीफिशियल इंटेलिजन्स' म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. कन्टेन्ट तयार करणे, फोटो, व्हिडीओ तयार करणे, प्रेझेन्टेशन करणे अशा प्रकारची कामे या माध्यमातून करण्यास सुरुवात झाली आहे.

AI आल्यामुळे सध्या नोकऱ्यांमध्ये कशा प्रकारे बदल घडत आहे?

'ओपन एआय' च्या 'चॅट जीपीटी' आणि गुगलच्या 'जेमिनी' या मॉडेल सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढत असून खर्चात कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु काही नवीन संधी देखील यामुळे निर्माण होण्याच्या शक्यता आहेत.

(Skills needed for generative AI )

Robot

AI तंत्रज्ञान जवळपास ५० वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. परंतु २०२२ मध्ये OpenAI चा चॅटबॉट ChatGPT लाँच झाल्यापासून, जनरेटिव्ह AI ही काहींना धोक्याची घंटा वाटत आहे तर काही जणांना यातून नव्या संधी निर्माण होतील अशी आशा वाटत आहे.

'ऑलीवर वायमन' ही अमेरिकेतील व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनी २० देशांतील महिन्याला २ लाख लोकांचा अभ्यास करत आहे. त्यातून असे समोर आले आहे की, कंपनीतील वरिष्ठ अधिकारी किंवा मालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून नवीन कौशल्य आत्मसात करण्याची अपेक्षा आहे.

खालील पाच कौशल्य आत्मसात करणे आवश्यक

  • विश्लेषणात्मक विचार करता येणे

  • सर्जनशील विचार विचार करणे

  • नेतृत्व कौशल्ये आणि सामाजिक प्रभाव पडण्याची क्षमता

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्स, टूल्सचा वापर करून डेटा चे व्यवस्थापन आणि विश्लेषण

  • कुतूहल आणि नव्या गोष्टी शिकण्याची इच्छा

ऑलिव्हर वायमनच्या संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की, अनेक कर्मचारी हे AI आणि डेटा या विषयावरचे प्रशिक्षण घेताना दिसतात याउलट एम्प्लॉयर म्हणजेच कंपनीच्या मालक वर्गाला वाटते की, डेटाचे व्यवस्थापन तंत्रज्ञान करू शकेल मात्र त्याचे विश्लेषण करून त्यावर निष्कर्ष काढणे हे अवघड काम आहे आणि ते कर्मचाऱ्यांना येणे गरजेचे आहे.

ऑलिव्हर वायमन फोरमचे वरिष्ठ सहकारी सायमन लुओंग यांनी 'सीएनबीसी मेक इट' मुलाखतीत सांगितले की, "जनरेटिव्ह एआयमध्ये सूक्ष्म निरीक्षणे आणि नैतिक निर्णय घेण्याचा आभाव दिसतो जो मानवी मेंदूला करणे शक्य आहे."

(latest Marathi news of artificial intelligence)

AI Anand Deshpande

AI कडून काम करून घेण्यासाठी कौशल्य आवश्यक

सध्या AI विषयाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती रोज आपली कामे मशीनला सांगून करतो आहे. जसे की नाश्ता बनविणे, पंख चालू करणे, कोणी आले असेल तर दार उघडणे, व्हॉइस ओळखून घर बंद करणे किंवा उघडणे. परंतु एके दिवशी दात काढल्यामुळे त्याला नीट बोलता येत नसते आणि AI त्याचा आवाज नीट समजू न शकल्यामुळे त्याला घराबाहेरच राहावे लागते. किंवा त्याची कशी फजिती होते हा सांगणारा तो व्हिडीओ आहे.

यातून हे सांगण्याचा प्रयत्न आहे की अजूनही AI या विषयावर पूर्णपणे अवलंबून राहण्यासारखी परिस्थिती नाही. सध्या AI च्या माध्यमातून 'रुटीन वर्क' होताना दिसत आहे. किंबहुना सुरुवातीच्या टप्प्यावर AI कडून ही कामे मोठ्या प्रमाणात करून घेण्याचा अनेक कंपन्यांचा प्रयत्न आहे.

परंतु मशीनच्या माध्यमातून योग्यरित्या काम करून घेण्यासाठी किंवा त्यातील धोके ओळखून काम करण्यासाठी अजून तरी मानवी ज्ञानाची, सृजनशीलतेची कौशल्यांची गरज आहे. बदलणाऱ्या काळासोबत ती कशी बदलत जातील त्याचा अभ्यास आणि निरीक्षण करून आपल्याला बदल करणे आवश्यक आहे.

(AI and job skills)

-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT