पुणे

108 रुग्णवाहिका चौकात उलटली

सकाळवृत्तसेवा

उंडवडी : अपघातातील जखमींना आणण्यासाठी निघालेल्या 108 रुग्णवाहिका बारामती- पाटस रस्त्यावरील रिंग रोडला समोरुन भरधाव आलेल्या दुचाकीला वाचविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भर चौकात पलटी  झाली. ही घटना आज (गुरुवारी) चार वाजण्याच्या सुमारास घडली. 

यामध्ये वैद्यकीय अधिकारी जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, आज दुपारी साडेतीन वाजता उंडवडी कडेपठार हद्दीत गॅस सिलेंडरचा ट्रक उलटला होता. या अपघातात जखमीना उपचार व्हावेत. यासाठी स्थानिक लोकांनी 108 या शासकीय रुग्णवाहिकेसाठी फोन केला होता. 

त्यानुसार ही रुग्णवाहिका बारामतीकडून - उंडवडी कडेपठारकडे भोंगा वाजतवत (सायरन) वेगात निघाली होती. बारामती शहराच्या बाहेर पाटस रस्त्याला आल्यानंतर देशमुख चौकात समोरील दुचाकीला वाचविताना रुग्णवाहिकेच्या चालकाने तातडीने ब्रेक लावला. यामध्ये रुग्णवाहिका जाग्यावर फिरली व पलटी झाली. आपघाताला कारणीभूत ठरलेला घटनेनंतर दुचाकीस्वार निघून गेला. 

या अपघातात वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक डोंबाळे हे जखमी झाले. त्यांच्या हाताला मार लागला आहे. तर चालक हेमंत खारतोडे यांना कोणतीही इजा झाली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT