11 lakhs stolen house burglaries at five places in pune crime police
11 lakhs stolen house burglaries at five places in pune crime police esakal
पुणे

Pune Crime : शहरात पाच ठिकाणी घरफोड्यांमध्ये ११ लाखांचा ऐवज चोरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात पाच घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे ११ लाख रुपयांचा ऐवज चोरी केला. सिंहगड रस्ता, विमानतळ, हडपसर आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील महालक्ष्मी पॅलेसमधील एका सदनिकेचा कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातून सुमारे एक लाख ८० हजार रुपयांचे साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी केले. ही घटना १५ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी प्रशांत नथू हनमघर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोहगाव येथे खेसे पार्कमधील घरातून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरी केले. ही घटना १८ ते १९ एप्रिलदरम्यान घडली. याबाबत ईशा रमेंद्र पाक (रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका घटनेत लोहगाव परिसरातच गुरुद्वारा रस्त्याजवळ फिर्यादी गुलाब गोपाळ ओव्हाळ यांच्या घरातून चोरट्यांनी साडेतेरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १९ एप्रिल रोजी पहाटे घडली.

हडपसर साडेसतरा नळी येथील एका सदनिकेतून चोरट्यांनी दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी केली. याप्रकरणी प्रियांका मिश्रा यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, उंड्रीजवळ वडाची वाडी येथील ‘द वात्सल्य स्कूल’ या शाळेतून चोरट्यांनी ७२ हजारांची रोकड चोरी केली. याबाबत विनिता राजीव अरोरा (रा. वानवडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT