पुणे

दौंडमध्ये ‘बजंरगी भाईजान’ 

सकाळवृत्तसेवा

केडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी भाईजान’ मिळाला. त्यांनी त्याचा सांभाळ केला. अखेर यवतचे फौजदार राहुल यादव व देऊळगावगाडाचे माजी सरपंच डी. डी. बारवकर यांनी त्याच्या आईवडिलांशी भेट घडवून आणली.  

अमित शफीक सय्यद (रा. हाजीमलंगवाडी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) हा १५ ऑगस्ट रोजी, ‘शाळेत जातो’ असे म्हणून गेला. मात्र, तो परत आला नाही. पालकांनी त्याचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे शफीक सय्यद यांनी पोलिसांत तक्रार दिली; पण त्याचाही उपयोग झाला नाही. हा मुलगा देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे आला. तेथे टुले यांच्या निदर्शनास तो आला. त्यांनी विचारपूस करत त्याला घरी नेले आणि अंघोळ घालून कपडे, जेवण दिले. काही दिवस सांभाळ केला. त्यांनी त्याच्याकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काहीच बोलत नव्हता. त्यांनी हा प्रकार बारवकर यांना सांगितला.     

बारवकर यांनी याबाबत यवत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तेव्हा त्याने फक्त शाळेचे नाव सांगितले. पोलिसांनी शाळेचा पत्ता शोधून काढला व लगतच्या पोलिस स्थानकात चौकशी केली. त्यात तो बेपत्ता झाल्याचे समजले. त्यानुसार अंबरनाथ पोलिसांनी सय्यद यांच्याशी संपर्क साधला. ते यवतला आल्यानंतर त्यांच्या ताब्यात अमितला दिले. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. सय्यद कुटुंबीयांनी ग्रामस्थ व पोलिसांचे आभार मानले. 

प्रवासाचे गूढ
अमितचा अंबरनाथ ते दौंड हा प्रवास कसा झाला, याबाबत काहीच माहिती मिळत नाही. अमित हा हाजीमलंगवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहे. त्याचे वडील शफीक हे कल्याण ते भिवंडी येथे भाडोत्री रिक्षा चालवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT