बुधवार पेठ - घरांच्या आणि दुकानांच्या पुनर्वसनासाठी महामेट्रोने तयार केलेल्या पाच इमारतींपैकी एका नियोजित इमारतीचे संकल्पचित्र.
बुधवार पेठ - घरांच्या आणि दुकानांच्या पुनर्वसनासाठी महामेट्रोने तयार केलेल्या पाच इमारतींपैकी एका नियोजित इमारतीचे संकल्पचित्र. 
पुणे

भुयारी मेट्रोसाठी ११६० कोटी

सकाळवृत्तसेवा

पुणे - पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गातील फडके हौद ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाची सुमारे ११६० कोटी रुपयांची निविदा महामेट्रोने नुकतीच मंजूर केली आहे. मेट्रोसाठी बोगदा खणण्यासाठी हाँगकाँगमधून आधुनिक ‘टनेल बोअरिंग मशिन’ पुण्यात येणार आहे. टाटा आणि गुलेरमार्क या कंपन्यांकडून भुयारी मेट्रोचे काम होणार आहे. 

पिंपरी-स्वारगेट हा मेट्रो मार्ग १६.५८ किलोमीटरचा आहे. त्यातील ५.०१ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट दरम्यानचा मार्ग भुयारी आहे. त्यात शिवाजीनगर बस स्थानक, शिवाजीनगर न्यायालय, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट अशी पाच स्थानके आहेत. त्यातील फडके हौद, मंडई आणि स्वारगेट येथे भुयारी स्थानके आहेत. मेट्रोसाठी दोन भुयारी ट्यूब करण्यात येणार आहेत. 

हाँगकाँगमधून येणाऱ्या मशिनची लांबी सुमारे १२० मीटर असून, सुमारे ८ मीटर रुंद आहे. हे मशिन रोज सुमारे ५ मीटर बोगद्याची खोदाई करेल. सप्टेंबरमध्ये मशिन पुण्यात दाखल होऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरवात होईल, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. 

भुयारी मेट्रोचे काम दाट लोकवस्तीच्या भागात होणार आहे. या मार्गामुळे २९६ घरे, १०६ दुकानांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यांना त्याच परिसरात पर्यायी घरे आणि दुकाने देण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याला संबंधितांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. राज्यात नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT