खडकवासला (पुणे) : खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते 11 या पहिल्या चार तासात 15.54 टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या टप्यात मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे.
एकूण 4लाख 86 हजार मतदारांपैकी 75 हजार 668 जणांनी मतदान केले आहे. यामध्ये पुरुष 47हजार244, महिला 28हजार424 यांनी मतदान केले आहे.
भाजपचे उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांनी सकाळीच धनकावडीतील प्रियदर्शनी शाळेत पत्नी समवेत जाऊन मतदान केले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक सचिन सचिन दोडके यांनी वारजे येथील राघवदास विद्यालयात पत्नीसह जाऊन मतदान केले. बसपाचे उमेदवार दीपक बलाढे यांनी रामनगर शाळेत जाऊन मतदान केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.