dark-at-wagholi.jpg
dark-at-wagholi.jpg 
पुणे

वाघोलीत 174 सदनिकाधारक पाच दिवसांपासून अंधारात

निलेश कांकरिया

वाघोली : वाघोलीतील आव्हाळवाडी रोडवरील उत्सव रेसिडन्सी मधील 174 सदनिकाधारक पाच दिवसापासून अंधारात आहेत. जेसीबीच्या खोदकामात महावितरणची केबल तुटल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पाणी, लिफ्ट यासाठी जनरेटरवर मोठा खर्च होत आहे. या प्रकाराने रहिवासी हैराण झाले आहेत.

या सोसायातील वीज पुरवठा करणारी केबल भूमिगत आहे. त्या परिसरात खोद काम सुरू असताना पाच दिवसांपूर्वी ही केबल तुटली. सोसायटी धारकांनी महावितरणला ऑनलाइन व महावितरण कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. कर्मचाऱ्याने ती केबल जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे पुन्हा समस्या निर्माण झाली. यानंतर महावितरणने तेथील समस्या शोधली. मात्र ती दूर करण्यासाठी ''तुम्ही जेसीबी द्या. तुम्ही त्याचा खर्च करा असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोसायटीधारकांना सांगितले. यापूर्वी 4 ते 5 वेळा हा प्रकार घडला आहे. त्यावेळीही सोसायटी धारकांना चार ते पाच दिवस अंधारात राहावे लागले होते. तसेच पैसे खर्च करावे लागले होते. दुरुस्तीचा खर्च मोठा होत असल्याने सोसायटी धारक तो देऊ शकत नाही. शनिवारी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन तक्रार केली.

ऑनलाइन तक्रार अन् निराकरण
सोसायटी धारकांनी ऑनलाइन तक्रार केल्यावर ती दुरुस्त न होताही तक्रारींचे निराकरण केल्याचे ऑनलाइन साईटवर दिसते.


 पाच दिवसात डिझेलसाठी 40 हजार      
जनरेटरवर पाणी, लिफ्ट व सोसायटीतील कॉमन वीज चालते. पाच दिवसात जनरेटरसाठी सुमारे सहाशे लिटर डिझेल लागले. त्यासाठी 40 हजार रुपये खर्च झाला.

भुर्दंड नागरिकांना
वाघोलीत अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बेकायदा खोद काम केले जाते. त्यामुळे केबल्स, जलवाहिन्या तुटतात. त्याचा भुर्दंड नागरिकांना बसतो. मात्र ग्रामपंचायत अशा बेकायदा कामावर कारवाई करत नाही.

"पाच दिवसांपासून आम्ही अंधारात आहोत. यामुळे खूपच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गरजेची वीज उपकरणे चालू ठेवावी लागत असल्याने डिझेलवर मोठा खर्च होत आहे. यापूर्वी ही चार पाच वेळा असा प्रकार झाला आहे. पाणी, कचरा ती समस्या वेगळीच. वाघोलीत राहायचं कस तेच कळत नाही.

कालच तक्रार प्राप्त झाली आहे. पावसामुळे काम करण्यास विलंब होत आहे. पाऊस थांबला की त्वरित काम करू. सोसायटीने पैसे द्यायची गरज नाही.
- श्रीखंडे, अभियंता, महावितरण वाघोली कार्यालय.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT