पुणे

निरवांगीमध्ये चारा छावणी सुरु....

राजकुमार थोरात

वालचंदनगर: निरवांगी (ता.इंदापूर) येथे सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याच्या माध्यमातुन तालुक्याच्या पश्‍चिम भागातील पहिली चारा छावणी सुरु करण्यात आली. छावणीसाठी ११६६ जनावरांची नोंदणी झाली असून पहिल्या दिवशीच ४१० जनावरे दाखल झाली आहेत.

इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळाची भयान  तीव्रता आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील पहिल्या चारा छावणीची सुरवात आज बुधवार (ता.05)रोजी करण्यात आली. निरवांगी, निमसाखर, खोरोची परीसरातील 288 शेतकऱ्यांनी 1166 जनावरांची नोंद निरवांगीच्या तलाठी कार्यालयामध्ये केली आहे.पहिल्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत 410 जनावरे  छावणीमध्ये आली होती. यामध्ये 318 मोठ्या जनावरांचा समावेश आहे. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, 67 वर्षानंतर राज्यामध्ये भयानक दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांना जनावरे जगविताना दमछाक होत आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये सोनाई परिवारच्या माध्यमातुन पहिली चारा छावणी सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले की, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेवून तालुक्यामध्ये चारा छावणी सुरु केली असून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा कसदार चार,पेंड उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, सोनाई परिवारचे अध्यक्ष दशरथ माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,छत्रपतीचे  सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, निरवांगीच्या सरपंच रेखा माने, माजी सरपंच दशरथ  पोळ, दत्तू पोळ, निमसाखरचे माजी उपसरपंच नंदकुमार पाटील, संजय जाधव, दादासाहेब भाळे, संपत सरक, दादासाहेब काळे, आकाश कांबळे, शुभम शिंगाडे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संजय शिंदे, तलाठी मदन भिसे, ग्रामसेवक संजय भोसले उपस्थित होते.

सोनाई मुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळणार दिलासा
इंदापूर तालुक्यामध्ये सुरु झालेल्या चारा छावणीमध्ये सातबारा उतारा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांना प्रवेश दिला आहे. मात्र तालुक्यातील अनेक नागरिक मोल मजूरी करुन जीवन जगत आहे.त्यांच्याकडेही जनावरे आहेत.त्यांना जमीन नसल्यामुळे त्यांच्याकडे सातबारा उतारा नसून दुष्काळामध्ये  जनावरांचा सांभाळ करताना दमछाक होत असल्याने   सातबारा उतारा नसणाऱ्या  नागरिकांच्या जनावरांना सोनाई परिवारच्या माध्यमातुन छावणीमध्ये मोफत चारा व पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने व पुणे जिल्हा परिषदेचे  बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी जाहिर केल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT