20 incidents of tree falling in city Rescue of calf trapped in river firefighters
20 incidents of tree falling in city Rescue of calf trapped in river firefighters file photo
पुणे

पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात दिवसभरात झाडपडीच्या 20 घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शनिवारी दिवसभर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात 20 हून अधिक झाडपडीच्या घटना घडल्या. तर डेक्कन नदीपात्रातील पाण्यात अडकलेल्या एका वासराचे अग्निशामक दलाच्या जवानांनी प्राण वाचविले. शहरात शनिवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. याबाबत अग्निशामक दलास खबर मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून संबंधित ठिकाणांवर जाऊन झाडे बाजुला करुन रस्ता वाहतुकीस मोकळा करुन देण्यास प्राधान्य देण्यात आले

विमानतळ पोलिस चौकी जवळ, वडगाव शेरी येथील पुण्यनगरी सोसायटी, सातारा रस्ता येथील रम्यनगरी सोसायटी, बीएमसीसी रस्त्यावरील कदम बंगला, चिंतामणी नगर येथील दामोदर सोसायटी, आंबेगाव पठारावरील दत्तनगर, वानवडी येथील जांभूळकर चौक, पाषाणजवळील सुतारवाडी, निम्हण बाग, बावधन येथील तपोवन सोसायटी, कोथरुडमधील आयडियल कॉलनी, सहकारनगरमधील तळजाई रस्ता, भांडारकर रस्त्यावरील हॉटेल अजित, टिंगरेनगर येथील विद्यानगर सोसायटी, आदर्श कॉलनी, सिहंगड रस्ता परिसर, बिबवेवाडी येथील भगली हॉस्पिटल, औंध येथील शिवनेरी बसस्टॉप, बालेवाडी येथील सदानंद हॉटेल व गोखलेनगर परिसरात झाडपडीच्या घटना घडल्या. दरम्यान, डेक्कन येथील नदीपात्रामध्ये एक वासरु पाण्यामध्ये अडकल्याची खबर अग्निशामक दलास मिळाली होती. त्यानुसार, अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी पोचून वासराला पाण्याबाहेर काढून जीवदान दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT