Panshet-Dam sakal
पुणे

खडकवासला प्रकल्पात २६.५१ टीएमसी पाणी; पानशेत भरले

खडकवासला प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने संततधारध पाऊस सुरु असल्याने या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा हा आजखेरपर्यंत (ता.११) २६.५१ टीएमसी झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने संततधारध पाऊस सुरु असल्याने या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा हा आजखेरपर्यंत (ता.११) २६.५१ टीएमसी झाला आहे.

पुणे - खडकवासला प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने संततधारध पाऊस सुरु असल्याने या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा हा आजखेरपर्यंत (ता.११) २६.५१ टीएमसी झाला आहे. या प्रकल्पातील चारही धरणे पूर्ण भरण्यास आणखी २.६४ टीएमसी पाणी कमी आहे.

दरम्यान, गतवर्षी याच दिवशीच्या एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा १.४२ टीएमसी इतका कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेला एकूण २७.९३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांतील मिळून एकूण पाणी साठवण क्षमता ही २९.१५ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठ्यापैकी पुणे शहराला पिण्यासाठी एका वर्षात सुमारे १५ टीएमसी पाणी लागत असते.

खडकवासला प्रकल्पात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चार धरणे येतात.

धरणनिहाय एकूण पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

- खडकवासला ---- १.९७

- पानशेत ---- १०.६५

- वरसगाव ---- १२.८२

- टेमघर ---- ३.७१

- एकूण ---- २९.१५

धरणनिहाय ११ अॉगस्टचा (यंदाचा) पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

- खडकवासला --- १.४८

- पानशेत --- १०.६५

- वरसगाव --- ११.६२

- टेमघर --- २.७६

- एकूण पाणीसाठा ---- २६.५१

धरणनिहाय गतवर्षीचा याच तारखेचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

- खडकवासला ---- १.७२

- पानशेत ---- १०.६५

- वरसगाव ---- १२.३९

- टेमघर ---- ३.१७

- एकूण पाणीसाठा ----- २७.९३

गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा स्थिती

- चारही धरणांतील एकूण साठा --- २६.५१

- गेल्या वर्षीचा या तारखेचा साठा --- २७.९३

- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा एकूण पाणीसाठा --- १.४२ टीएमसीने कमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT