पुणे रेल्वे स्थानक - फलाट क्रमांक तीनवर बुधवारी पोलिस निरीक्षकावर झालेल्या गोळीबाराच्या ठिकाणी श्‍वान पथकाच्या मदतीने तपास करताना पोलिस.
पुणे रेल्वे स्थानक - फलाट क्रमांक तीनवर बुधवारी पोलिस निरीक्षकावर झालेल्या गोळीबाराच्या ठिकाणी श्‍वान पथकाच्या मदतीने तपास करताना पोलिस. 
पुणे

पुण्यात गोळीबाराच्या ३ घटना

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात वडगाव शेरी, येवलेवाडी आणि पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दिवसभरात घडलेल्या गोळीबाराच्या सलग तीन घटनांमुळे एकच खळबळ उडाली. वडगाव शेरी येथील गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील हल्लेखोरांना ताब्यात घेताना एकाने केलेल्या गोळीबारात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक गजानन पवार गंभीर जखमी झाले. तर येवलेवाडीमधील घटनेत सराफ दुकानातील कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. 

भरदिवसा गोळीबाराच्या तीन घटना घडल्यामुळे शहर पोलिसांच्या आणि गुन्हे शाखेच्या पथकांचा तपास ढवळून निघाला आहे. तिन्ही घटनांत मिळून दोघांना अटक झाली आहे. वडगाव शेरी येथील गोळीबाराच्या घटनेत एकता ब्रिजेश भाटी (वय ३२, मूळ रा. नोएडा, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील संशयितांना गुन्हे शाखा आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करीत अटक केली. शिवलाल बाबूलाल राव (वय ३९) आणि मुकेश जगराम राव (दोघे रा. नवी दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, लोहमार्ग अधीक्षक दीपक साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास 

दोन हल्लेखोरांनी भाटी यांच्या घराची बेल वाजवली. एकता बाहेर आल्यानंतर एकाने त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. ही गोळी  हृदयाजवळ लागल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. गोळीचा आवाज ऐकून त्यांचे पती ब्रिजेश बाहेर आले. मात्र हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. ब्रिजेश यांनी एकता यांना हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, गोळीबार करून हल्लेखोर पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पुणे स्टेशनसमोरील पादचारी भुयारी मार्गात तो गेला. तेथेही पोलिस पोचले. त्या वेळी त्याने तेथेही गोळीबार केला. सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नाही. पोलिसांनी त्याला काही वेळातच पकडले.  

पती ब्रिजेश यांनी त्यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागल्यामुळे काही लोकांचे देणे होते. त्यांच्यासाठीच हल्लेखोर पाठविले असावेत, अशी शक्‍यता व्यक्‍त केली. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त समीर शेख, युनिट दोनचे पोलिस निरीक्षक गजानन पवार, खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव, दरोडा प्रतिबंधकचे राजेंद्र कदम यांची पथके हल्लेखोरांच्या मागावर होती. दुपारी साडेचारच्या सुमारास हल्लेखोर पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यावरून गजानन पवार हे फलाट क्रमांक तीनवर दिल्लीला जाणाऱ्या झेलम एक्‍स्प्रेसमध्ये तपासणी करीत होते. त्या वेळी एका पोलिस कर्मचाऱ्याने वर्णनावरून हल्लेखोरांना ओळखले. त्यांच्याकडे चौकशी करीत असताना एका हल्लेखोने पवार यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या चेहऱ्यावर लागून दाताला लागली. तर दुसरी गोळी फुफ्फुसात घुसली. त्यात पवार गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

ब्रिजेश भाटी हे त्यांची पत्नी एकता, दोन जुळी मुले आणि वडील इंद्रमणी सोसायटीत अडीच वर्षांपासून राहतात. ब्रिजेश यांचा वाहनकर्ज मिळवून देण्याचा ब्रोकरेजचा व्यवसाय होता. त्यांनी इस्टेट एजंट म्हणून व्यवसाय करताना तोटा झाला. अनेकांनी पैशांसाठी तगादा लावल्यामुळे ते पुण्यात राहण्यास आले होते. एकता भाटी या परिसरातील आयटी कंपनीतील युवकांना जेवणाचे डबे पुरवित होत्या.

घटनाक्रम 
सकाळी ७.४५ - वडगाव शेरी, एकता भाटी यांचा मृत्यू
दुपारी १.३० - येवलेवाडी, अमृत परिहार गंभीर जखमी
सायंकाळी ४.४५ - रेल्वे स्थानक, पोलिस निरीक्षक गजानन पवार गंभीर जखमी

दौंडमध्ये कारवाई 
वडगाव शेरी गोळीबार घटनेतील संशयित मुकेश जगराम राव हा त्यानंतर झेलम एक्‍स्प्रेसने पळून गेला. गोळीबाराच्या घटनेची माहिती शहर व रेल्वे पोलिसांनी दौंडच्या पोलिसांना दिली होती. तसेच संशयिताचे वर्णनही सांगितले होते. त्यानुसार रेल्वे पोलिसांच्या पथकातील निरीक्षक सुनील चाटे आणि कर्मचारी प्रदीव गोवेकर यांनी ‘झेलम’ची पाहणी करून मुकेशला वर्णनावरून ओळखले आणि पकडले. त्याच्या खिशात चाकू सापडला. त्याला अटक करून पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT