Water Tanker
Water Tanker Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात ३६ गावांत टॅंकर सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे विभागातील ५४ गावे आणि ३४२ वाड्यांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे.

पुणे - पुणे विभागातील ५४ गावे आणि ३४२ वाड्यांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे. या गावांमधील एकूण एक लाख २३ हजार ४७६ लोकसंख्येला सध्या टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पुणे, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यातील गावांचा यात समावेश आहे. आतापर्यंत कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सोलापूर आणि बागायती क्षेत्र असलेला कोल्हापूर, या दोन जिल्ह्यांत अद्यापपर्यंत एकही टॅंकर सुरु झालेला नाही. त्यामुळे हे जिल्हे आता टॅंकरमुक्त म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.

विभागातील पुणे जिल्ह्यात सध्या सर्वाधिक ५४ टॅंकर सुरु असून त्या माध्यमातून ३६ गावे आणि २५३ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील ९६ हजार ३८० लोकसंख्या ही टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. विभागातील बारा तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना सध्या २५ सरकारी आणि ४५ खासगी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे १ हजार ८६९ पशुधनाला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे. या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ७२ खासगी विहीरी व विंधनविहिरींचे अधिगृहण करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

पुण्यातील सहा तालुके टॅंकरमुक्त

यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांत एकही टॅंकर सुरु झालेला नाही. त्यामुळे हे तालुके सध्या तरी टँकरमुक्त तालुके म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या तालुक्यांत गेल्या काळात कायम टॅंकर सुरू असणाऱ्या इंदापूर व दौंड या दोन तालुक्यांचा समावेश आहे. तसेच हवेली, मावळ, मुळशी व वेल्हे हे तालुकेही टॅंकरमुक्त झाले आहेत.

जिल्हा टॅंकर गावे वाड्या बाधित लोकसंख्या

पुणे ५४ ३६ २५३ ९६३८०

सातारा ०८ १० २९ ११४४५

सांगली ०८ ०८ ६० १५६५१

एकूण ७० ५४ ३४२ १२३४७६

या तालुक्यांत सुरू

आंबेगाव, बारामती, भोर, जुन्नर, खेड, पुरंदर, शिरूर (सर्व पुणे जिल्हा). माण, वाई, सातारा, कराड (सर्व सातारा जिल्हा) आणि जत (जिल्हा सांगली).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT