marrigold flower
marrigold flower 
पुणे

फुलांचा बाजार बहरला; झेंडूची 45 टन आवक | Diwali Festival 2019 News

सकाळ वृत्तसेवा

 Diwali Festival 2019 : मार्केट यार्ड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फूलबाजारात मोठी आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी बाजारात 42 ते 45 टन झेंडूची, तर शेवंतीच्या फुलांची 20 टन आवक झाली. दिवाळीमुळे झेंडूच्या मागणीत वाढ झाली असली, तरी राज्यासह जिल्ह्याच्या काही भागांत सुरू असलेल्या पावसामुळे फुलांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात दाखल होत असलेल्या ओल्या फुलांना कमी भाव मिळत आहे, अशी माहिती फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. 

घाऊक बाजारात झेंडूला प्रतिकिलोस दर्जानुसार 10 ते 60 रुपये, तर शेवंतीच्या फुलांना 30 ते 100 रुपये भाव मिळत आहे. तसेच, किरकोळ बाजारात प्रतिकिलो झेंडूला 40 ते 100 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. दिवाळीत धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपूजन तसेच पाडव्यानिमित्त पूजेसाठी फुलांना मोठी मागणी असते. विशेषतः झेंडू, शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे किरकोळ बाजारात झेंडूची चढ्या दराने विक्री होत आहे. 

बाजारात पुणे जिल्हा, धाराशीव, नगर, सातारा, वाई, सोलापूर भागातून झेंडूची मोठी आवक होते. तसेच बाजारातून मुंबई, ठाणे, कोकण भागात झेंडू विक्रीसाठी पाठविला जातो. आकर्षक रंग आणि आकाराने मोठ्या असलेल्या कोलकता झेंडूचा वापर तोरण तसेच सजावटीसाठी केला जातो. 

फूलविक्रेत्यांकडून झेंडूला चांगली मागणी आहे. झेंडूसह शेवंती, गुलछडी, लिली, गुलाब गड्डीला मागणी चांगली आहे. मात्र, फुले भिजलेली असल्याने खरेदीदारांकडून कमी प्रमाणात खरेदी केली जात आहे. उद्यापासून बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती फुलाचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT