Noteban.jpg
Noteban.jpg 
पुणे

नोटाबंदीदरम्यान, खोट्या नोटा देऊन बँकेची 5 लाखांची फसवणूक

पांडुरंग सरोदे

पुणे : नोटाबंदीवेळी चलनातील जुन्या नोटा बँकेत बदलून घेत असताना सहा लाख रूपयांच्या बनावट नोटा जमा करत एका बँकेची फसवणूक करण्यात आली. टिळक रस्त्यावरील नोव्हेंबर 2016 मध्ये हा प्रकार घडला आहे. 

याप्रकरणी बॅंकेतर्फे रोहनकुमार सिंग ( रा बाणेर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरुन अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे युनियन बँक ऑफ इंडियाच्या टिळक रस्ता शाखेत व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांच्या शाखेत एका ग्राहकाने चलनातून बाद झालेल्या जुन्या एक हजार रूपयांच्या नोटा आणि पाचशे रूपयांच्या नोटा अशा एकुण 5 लाख 94 हजार रूपये बँकेत जमा केले.

दरम्यान, या कालावधीत शाखेत जमा झालेली सहाशे कोटी रूपयांची रक्कम बदलापूर येथील आरबीआयच्या नोटा छपाई कारखान्यात पाठवून देण्यात आली. तेथे नोटांची तपासणी करीत असताना एका ग्राहकाने भरलेल्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, याप्रकरणी रोहनकुमार यांनी रक्कम जमा केलेल्या ग्राहकाविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार डी.आर.गभाले करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT