पुणे

बाणेरच्या हॉस्पिटलमधून 50 रुग्ण कोरोनामुक्त 

सकाळवृत्तसेवा

पुणे - बाणेरच्या कोविड हॉस्पिटलमधील उपचार व्यवस्थेत बदल केल्यानंतर अतिदक्षता (आयसीयू) आणि ऑक्‍सिजन बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये 282 रुग्णांची व्यवस्था आहे. सध्या 182 रुग्णांवर उपचार सुरू असून उपचारानंतर गेल्या आठवडाभरात 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या सुविधेची व्याप्ती वाढविण्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनंतर संशयितांवरील उपचारापासून, कोरोनाची तपासणीचे नियोजन महापालिका करीत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या रुग्णांसाठी बाणेर येथे सुमारे सव्वातीनशे बेडचे स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात डॉक्‍टर नसल्याने उपचारांत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर जुन्या एजन्सीला काढून नव्या एजन्सीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्‍टरांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे रोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर नेमके व वेळेत उपचार करणे शक्‍य होत असल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापनाने स्पष्ट केले. हॉस्पिटलमध्ये 250 रुग्णांसाठी ऑक्‍सिजन बेड; तर 32 "आयसीयू' बेड आहेत. त्यात दहा व्हेंटिलेटरचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT