83 lakh fraud with businessmen lure of big work contract pune crime police
83 lakh fraud with businessmen lure of big work contract pune crime police esakal
पुणे

Crime News : कामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने ८३ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ८३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा समोर आला आहे. १९ एप्रिल २०१८ ते मे २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी राजेश कृष्णाथ एकबोटे (वय ५३, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बिबवेवाडी पोलिसांनी हेमंत रायकुमार खिंवसरा यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश एकबोटे यांची किमया इन्फोटेक एलएलपी कंपनी आहे. या कंपनीमार्फत लॉटरी आणि बॅंकिंग व्यवसायासाठी अप्लिकेशन तयार करण्याचे काम केले जाते. एका व्यक्तीच्या माध्यमातून एकबोटे आणि खिंवसरा यांची ओळख झाली. त्यावेळी एकबोटे यांनी खिंवसरा यांच्यासोबत भागीदारीत प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवली.

त्यानंतर प्रकल्पाची वर्कऑर्डर मिळवणे, निविदा मिळविण्यासाठी संबंधित राजकीय व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना रक्कम द्यावी लागेल, असे सांगून खिंवसरा आणि त्यांच्या साथीदारांनी वेळोवेळी ८३ लाख रुपये घेतले. परंतु ही रक्कम परत न करता एकबोटे यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT