pune
pune  sakal
पुणे

पुणे महापालिकेत समाविष्ट ९ गावे झिकाबाबत अतिसंवेदनशील; यादी जाहीर

विनायक होगाडे

पुणे : पुणे महानगरपालिकेत आतापर्यंत समाविष्ट झालेल्या आणि पूर्वाश्रमीच्या जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात असलेल्या गावांपैकी नऊ गावे ही झिका विषाणू संसर्गाच्या बाबतीत अतिसंवेदनशील आहेत. याशिवाय जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७० अशी शहर व जिल्ह्यातील एकूण ७९ गावे झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी (ता.६) झिकाबाबतच्या अतिसंवेदनशील गावांची यादी जाहीर केली आहे.

या यादीत पालिकेत समाविष्ट झालेल्या केशवनगर, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे, नांदेड, नऱ्हे, वाघोली, मांजरी बुद्रूक (सर्व ता. हवेली) आणि सूस (ता.मुळशी) या नऊ गावांचा समावेश आहे. झिका हा डेंगी आणि चिकुनगुनियासुदृश आजार आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात डेंगी आणि चिकुनगुनियाचा सातत्याने उद्रेक झालेल्या गावांची नावे झिकाच्याबाबतीत अतिसंवेदनशील यादीत समाविष्ट केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतच्या आदेशात नमूद केले आहे.

मागील तीन वर्षात मिळून ३४ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत. ही गावे पालिकेत समाविष्ट झाली असली तरी, या गावांना शिक्षण व आरोग्यविषयक सुविधा अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनामार्फतच पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेत समाविष्ट गावांची नावेही जिल्ह्यातील झिका अतिसंवेदनशील गावांच्या यादीत समाविष्ट केली आहेत.

अतिसंवेदनशील गावांच्या ग्रामपंचायतींनी आपापल्या गावात धूर फवारणीसाठी लागणारे पेट्रोल, डिझेल व कीटकनाशकांचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, गावातील गर्भवतींना मच्छरदाण्या आणि डास प्रतिबंधात्मक मलमांचे मोफत वाटप करावे, केरळ किंवा परराज्यात शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि परराज्यातून गावात येणाऱ्या सर्वांचे रक्त नमुने तपासणीसाठी मदत करावी, गाव व गावाचा परिसर तत्काळ स्वच्छ करावा, गावातील सर्व नागरिकांना झिकाबाबत दवंडी किंवा सूचनाफलकाच्या माध्यमातून माहिती द्यावी, गावातील पाणीसाठे झाकून ठेवण्याबाबत जनजागृती करावी आणि झिकाबाबत अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असा आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी अतिसंवेदनशील ग्रामपंचायतींना दिला आहे.

अतिसंवेदनशील तालुकानिहाय गावे

- जुन्नर --- आनंदवाडी, ओतूर, येणेरे, राजुरी, पिंपळवंडी, काळदरी.

- खेड --- राजगुरुनगर शहर, पांडूरंगनगर, शिरोली, आळंदी, मरकळ, भोसे, निघोजे, मोई, मेदनकरवाडी, गोसासी.

- आंबेगाव --- घोडेगाव.

- शिरूर --- वढू बुद्रूक, मांडवगणफराटा, गारमाळ, सादलगाव.

- दौंड --- दौंड शहर, समतानगर, होलारवस्ती, कुरकुंभ, हिंगणी बेर्डी.

- इंदापूर --- निमगाव केतकी, शेळगाव, यादववाडी, कुरवली, माळवाडी, तक्रारवाडी, भादलवाडी.

- हवेली --- देहू, नांदेड., नऱ्हे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे, खानापूर, मणेरवाडी, खेड, वाघोली, कोळवडी, मांजरी बुद्रूक, केशवनगर, उरुळीकांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळ, खामगाव टेक, पिंपरीसांडस, थेऊर.

- वेल्हे --- करंजावणे, खामगाव क्षेत्र, ओसाडे, साखर, आंत्रोली.

- मुळशी --- माण, सूस.

- बारामती --- तरडोली, सुपा, काळखैरेवाडी, मोरगाव, सटवाजीनगर, अंबराई, आनंदनगर, तांदूळवाडी, माळेगाव विद्यानगर, सुर्यनगरी, कटफळ.

- पुरंदर --- सासवड, ढुमेवाडी, पारगाव, नीरा, सुपे खुर्द, बेलसर, जेजुरी.

- भोर --- भुतोंडे, चिखलावडे, वाठार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT