राज ठाकरे घेणार मराठवाड्यात मेळावा; पुण्यात घेतली बैठक

Raj-Thackeray
Raj-Thackeraygoogle

पुणे : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यासाठी आपले संघटन मजबूत करा, शाखा अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच मराठवाड्यात कार्यकर्ता मेळावा घेणार आहे, त्यासाठी तयारी करा अशा सूचना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्या. मनसेच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी सायंकाळी बैठक घेतली. जवळपास सव्वा तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी जिल्हाध्यक्षांचे म्हणणे ऐकून घेतले, त्यानंतर संघटना मजबूत करण्याच्या सूचना दिल्या.

Raj-Thackeray
JEE Main 2021 परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पहा निकाल

आगामी काळात मराठवाड्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा. मनसेचे संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्त करा. ही निवडणूक पूर्ण शक्तीने लढवून आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती ताब्यात घ्यायची आहे असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढच्या काही दिवसात मार्गदर्शन शिबिर आयोजित करा, मी त्याला स्वतः उपस्थित राहीन असेही बैठकीत सांगितले.

मुंबई बरोबर मराठवाड्याला वेळ द्या

आगामी काळात मुंबई, पुणे महापालिकेची निवडणूक आहे, त्याच वेळी मराठवाड्यात सुद्धा निवडणूका असणार आहेत. राज ठाकरे यांचा जोर मुंबई, पुण्यावर जास्त असतो, मराठवाड्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे यंदा मुंबई बरोबरच मराठवाड्यातील निवडणुकांच्या प्रचाराला आले पाहिजे, अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com