पारधी तरुणांनी धरली मासेमारीची अनोखी वाट
पारधी तरुणांनी धरली मासेमारीची अनोखी वाट sakal
पुणे

पारधी तरुणांनी धरली मासेमारीची अनोखी वाट

सकाळ वृत्तसेवा

भिगवण : गुन्हेगारीचा शिक्का असलेल्या आदिवासी पारधी समाजातील तरुणांनी मच्छीमारीच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह करत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. इंदापूर, दौंड, करमाळा, कर्जत व माढा या उजनी धरणाकाठच्या सुमारे चार हजार तरुणांनी गुन्हेगारीचा शिक्का पुसून मच्छीमारीचा व्यवसाय सुरु केला आहे. समाजसेवकांचे मार्गदर्शन व पोलिस प्रशासनाच्या प्रोत्साहनामुळे आदिवासी समाजातील अनेक कुटुंबाच्या जीवनामध्ये नवी पहाट उदयास आली आहे.

आदिवासी पारधी समाजातील समाजसेवक नामदेव भोसले हे मागील वीस वर्षापासून समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसला जावा व तरुणांनी सन्मानजनक व्यवसायातून प्रगती करावी यासाठी धडपडत आहे. त्यांनी पालावर जाऊन मुलांना शिक्षणाचे व व्यवसायाचे महत्त्व पटवून दिले. भोसले यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. भोसले यांनी समाजातील तरुण व पोलिस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नातून अनेक तरुणांनी शिक्षण घेऊन नोकरीचा मार्ग स्वीकारला आहे. तर इंदापूर, दौंड, करमाळा, माढा आदी उजनीकाठी असलेल्या तरुणांनी मच्छीमारीचा व्यवसाय स्वीकारला आहे. या भागातील सुमारे चार हजार तरुण पारंपारिक व्यवसाय सोडून मुख्य प्रवाहात आले आहे.

तक्रारवाडी(ता. इंदापूर) येथील आदिवासी पारधी समाजातील मच्छीमारांचा बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, समाजसेवक नामदेव भोसले, सरपंच सतीश विनायक वाघ यांनी पालावर जाऊन सत्कार केला. या उपक्रमांमधून तरुणांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होण्यास मदत झाली अशी भावना आदिवासी पारधी समाजातील तरुणांनी व्यक्त केली.

उजनीकाठचे आदिवासी समाजातील तरुण हे मच्छीमारीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येत आहेत, ही आनंदाची व समाधानाची बाब आहे. शिक्षणाच्या व व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करू इच्छिणाऱ्या तरुणांना पोलिस प्रशासनाचे सहकार्य राहील.

- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT