accident on Pune-Solapur National Highway 3 dead 3 injured police hospital
accident on Pune-Solapur National Highway 3 dead 3 injured police hospital sakal
पुणे

Pune Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; 3 जणांचा मृत्यू, तीन जखमी

सावता नवले

कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पांढरेवाडी हद्दीतील मुकादमवाडी येथे रविवारी (ता. २४) मध्यराञी भरधाव अज्ञात वाहनाने एका दुचाकीला व पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातीतील मृतात एकाच कुटुंबातील एक महिला व एका पुरूषाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावर पांढरेवाडी हद्दीतील मुकादमवाडी उड्डाण पुलाजवळ रविवारी (ता.२४ ) मध्यराञी पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका दुचाकीला व एका पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर प्रवास करणारे आरिफ सय्यद मुलाणी व मुना सय्यद मुलाणी ( रा. देवळी, ता. मोहाळ, जि.सोलापूर ) या एकाच कुटुंबातील दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

आणखी एक पायी जाणारे अमयान सादीक खान ( रा. जॉनपूर उत्तरप्रदेश ) या व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर सुरेश एकनाथ राऊत तर गणेश मधुकर शहाण ( रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे ) हे दोन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी दौंड येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात ऐवढा भयानक होता कि मृत महिलेचा मृतदेह वाहनात अडकून दीड किलो मिटर अंतरावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयासमोर महामार्गावर अढळून आला. या मृतदेहावरून महामार्गावरील अनेक वाहने गेल्याने शरीराचा चेंदामेंदा झाला होता. अपघातातील आणखी एका जखमीचे नाव समजू शकले नाही.

अपघातासंदर्भात सादीक शौकत मुलाणी यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी अज्ञात वाहन व चालकाविरूध गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील अज्ञात वाहनाबाबत अधिक माहिती असल्यास दौंड पोलिसांशी ०२११७/२६२३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा. अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon at Kerala: मॉन्सून प्रगतीपथावर, चोवीस तासात केरळमध्ये लावणार हजेरी; महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : उद्यापासून मध्य रेल्वेचा ६२ तासांचा मेगाब्लॉक; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द होणार

Ankush Gupta Research : मोबाईल लॅपटॉप अन् इलेक्ट्रिक कार.. १ मिनिटात चार्ज होणार ; भारतीय संशोधकाने बनवले 'हे' तंत्रज्ञान

Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपींना 20 वर्षे सक्तमजुरी

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

SCROLL FOR NEXT