bhor.jpg
bhor.jpg 
पुणे

भाटघर धरणाजवळ एसटीला अपघात; ९ जण जखमी

विजय जाधव

पुणे (भोर) : भाटघर धरणाजवळील नीरा-देवघर प्रकल्पाच्या कार्यालयाशेजारी सांगवी हिमा गावच्या हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या भोर आगाराची बस खड्यात घसरून झालेल्या अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने जिवीतहानी झाली 
नाही, परंतु प्रवाशांना दुखापत झाली आणि गाडीचेही नुकसान झाले. ही दुर्घटना गुरुवारी (ता.१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली. 

भोर आगारातील चालक शिवाजी बळी व वाहक मिनाक्षी भस्मे हे सकाळी १० वाजता एसटी (क्रमांक एमएच१२ बी.टी. ३३८७) घेऊन स्वारगेट ला निघाले होते. भाटघर धरणाजवळ नीरा-देवघर कार्यालयाच्या उतारावर समोरुन गाडी आल्य़ाने चालकाचा 
ताबा सुटला आणि एसटी डाव्या बाजूच्या गटाराच्या खड्यात पलटी झाली. आवाज ऐकल्यावर नीरा-देवघर प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी धावत गेले. शिवाजी डेंगळे, नामदेव पवार, पांडरंग शिंदे, राजू आवळे, दत्तात्रेय कोरके, राहूल गिलबिले, भैरवनाथ काटे, चेतन पालवे, प्रशात चऱ्हाटे टे, संतोष कांबळे या कर्मचाऱ्यांनी एसटीच्या पुढील व मागील काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. एसटीतील धाडसी युवक-युवती एसटीच्या खिडक्यांमधून बाहेर आले. एसटीच्या मागे असलेले 

मुख्याध्यापक प्रदीप वीर यांनीही त्यांनी सहकार्य केले. घटनेची माहिती मिळताच भोरमधील सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे कार्यकर्ते, पोलिस, एसटीचे अधिकारी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य झपाट्याने सुरु केले. जखमींना भोरच्या 
ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही प्रवाशांनी घरी फोन करून कुटुंबातील व्यक्तींना बोलावून घेऊन खासगी दवाखान्यात जाने पसंद केले. 

सह्याद्री फोर्सचे सचिन देशमुख, प्रमोद रवळेकर, अक्षय दामगुडे व संजय खरमरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. आगारप्रमुख स्वाती आवळे यांनीही घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. सुमन खोपडे (भोलावडे), मुक्ताबाई भिलारे (वरोड़ी), नवनाथ काटकर(भोर), मारुती बागल (नाझरे), चंद्रकांत चंदनशीव (किवत) आणि मारुती झुनगारे (सांगवीभिडे) या जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान भोर पोलिसांनी चालक शिवाजी बळी याच्यावर नष्काळजीपुणे वाहन 
चालवून अपघातास कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT