राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय - महिला चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. या वेळी (डावीकडून) ‘वेलकम होम’ चित्रपटातील प्रांजली श्रीकांत, मृणाल कुलकर्णी आणि डॉ. मोहन आगाशे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय - महिला चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. या वेळी (डावीकडून) ‘वेलकम होम’ चित्रपटातील प्रांजली श्रीकांत, मृणाल कुलकर्णी आणि डॉ. मोहन आगाशे. 
पुणे

अभिनयापेक्षा दिग्दर्शनात जास्त तणाव - मृणाल कुलकर्णी

सकाळवृत्तसेवा

पुणे - अभिनय करताना आपण केवळ स्वत:च्या कामावर लक्ष देत ते चांगल्या पद्धतीने कसे होईल, याचा विचार करत असतो. मात्र, दिग्दर्शन करताना आपल्याबरोबर तांत्रिकदृष्ट्या काम करणाऱ्या शंभर जणांसोबत आपल्याला जुळवून घ्यावे लागते. त्यामुळे अभिनयापेक्षा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात जास्त तणाव असल्याचे मत अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

 महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, आशय फिल्म क्‍लब आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित महिला चित्रपट महोत्सवाचा समारोप कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या.

 ‘तिच्या नजरेतून सिनेमा’ ही यावर्षीच्या महिला चित्रपट महोत्सवाची संकल्पना होती. तुम्ही स्वत:ला प्रेरणा कशी देता, या प्रश्नाचे उत्तर देताना कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘आपल्या आवडत्या कामामध्ये स्वत:ला बुडवून घेत त्यातून नवनवं शिकण्याचा, सकारात्मक राहण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते.’’ समारोप प्रसंगी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘वेलकम होम’ हा चित्रपटदेखील दाखविण्यात आला. त्यानंतर त्यातील कलाकारांचा सन्मान करून चित्रपटावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT