पुणे

पीएमपीचे प्रवासी पळविणाऱ्या 14 खासगी वाहनांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

पुणे -  पीएमपी बसथांबा, बीआरटी मार्ग आणि डेपो परिसरातून अनधिकृतरीत्या प्रवासी पळविणाऱ्या 14 खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस आणि पीएमपी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. 

शहरामध्ये पीएमपीचे प्रवासी पळविण्याचे प्रकार घडत आहेत. प्रवासी पळविणाऱ्या वाहनांवर गेल्या काही दिवसांपासून पीएमपी प्रशासनाकडून नजर ठेवण्यात येत होती. तसेच, याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी पीएमपीने केली होती. यानुसार वाहतूक विभागाने पीएमपीच्या मदतीने बसथांबा, बीआरटी मार्ग आणि डेपो परिसरातील प्रवासी पळविणाऱ्या 14 वाहनांवर कारवाई केली. डेपो आणि बसथांब्यांच्या परिसरातून खासगी वाहनचालक पीएमपीचे प्रवासी पळविण्याचा प्रकार शहरात घडत आहेत. त्यामुळे पीएमपीचे उत्पन्न घटत असून, फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. या प्रकाराला आळा बसण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यापुढेदेखील ती सुरू राहील, असे प्रशासनाच्या वतीने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT