Hapus Alphonso mango
Hapus Alphonso mango pravin doke
पुणे

महाराष्ट्रीयन हापूसच्या नावाने परराज्यातील हापूस विकणाऱ्यांना बसणार चाप

प्रविण डोके

पुणे : बाजारात आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु अनेक विक्रेत्यांकडून परराज्यातील विविध जातीचे आंबे ‘महाराष्ट्रीयन हापूस' या नावाने विकला जात आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. या फसवणुकीस आळा बसण्यासाठी राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी परिपत्रक काढले आहे. अश्या फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांना दिला आहे.आंब्याचा हंगाम सुरू असल्याने राज्यातील बाजार समितीच्या फळबाजार आवारात राज्यातून अथवा परराज्यातून आंबा या शेतमालाची मोठ्याप्रमाणात आवक होत असते. मात्र, व्यापाऱ्यांकडे येत असलेला आंबा हा संबंधित राज्यांच्या नावासह व आंब्याच्या जातीसह विक्री न करता तो महाराष्ट्रीयन हापूस या नावाने बाजार आवारात विक्री होऊन ग्राहकांची होत आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आपल्या अधिपत्याखालील फळ बाजार आवारात आवक होत असलेला आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने विक्री होईल, याबाबत दक्षता घेण्यात यावी. बाजार समित्यांनी बाजार आवारातील सर्व गाळेधारक, आडते, व्यापारी आणि बिगरगाळा धारक आडते व्यापारी व हुंडेकरी यांना त्यांच्या स्तरावरून याबाबत सक्त सूचना करण्यात याव्यात असे सोनी यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

अशाप्रकारे फसवणूक करून परराज्यातून आवक झालेला आंबा हा त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास, तसेच याबाबतची तक्रार झाल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आदेश सोनी यांनी दिले आहेत. बाजार समित्यांना दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन होईल. याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, तसेच जिल्हा उपनिबंधकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बाजार समित्यांमध्ये असे गैरप्रकार होऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही सोनी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT