Police Commissioner Amitesh Kumar
Police Commissioner Amitesh Kumar Sakal
पुणे

Amitesh Kumar : नियमभंग करणाऱ्या हॉटेल, पबचालकांवर होणार कारवाई; पोलिस आयुक्तांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या आदेशांचे पालन होत आहे की नाही यावर वॉच ठेवण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांकडून नियमित तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल तसेच पबच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली तयार केली आहे.

नियमावलीत हॉटेल, पबचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीनंतर हॉटेल, पब सुरू ठेवल्यास कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांकडून नियमित तपासणी करण्यात येणार आहे. ध्वनिवर्धकाचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त नसावा. रहिवासी भागातील पब, हॉटेलचालकांनी सामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे कुमार यांनी सांगितले.

शहरात काही इमारतींच्या छतावर (रुफटॉप) हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. तेथे बेकायदा मद्य विक्री केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. बेकायदा मद्य विक्री करणे गुन्हा आहे. त्यामुळे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवार्इ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नियमभंग करणारे परमीट रूम, हॉटेल, पबचालक यांना नोटीस बजावली जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कलम १४४ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी आहे. रात्री दहानंतर ध्वनिवर्धकाचा वापर केल्यास कारवाई केली जाणार आहे.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

पोलिसांनी केलेल्या सूचना -

- हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती देणे गरजेचे

- स्वच्छतागृह वगळून हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक

- हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक

- सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे असावेत

- हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी करावी

- कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक

- हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी (स्मोकिंग झोन) स्वतंत्र जागा असावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT