crime
crime 
पुणे

पोलिसाच्या घरात छळ; पत्नीची‌ बाळासह आत्महत्या

संदीप जगदाळे

हडपसर : पोलिस पत्नीने स्वतः अत्महत्या करून दोन वर्षाच्या स्वतःच्या कोवळ्या मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना हडपसर येथे शनिवारी(ता.22) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सासरच्या छळास कंटाळून ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व कौटूंबिक हिसाचार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सासु-सासऱ्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूनम उर्फ जान्हवी (वय २२, रा. टिळेकरवस्ती) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवांश असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. 

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार पूनमचा पती अमित दत्तात्रय कांबळे हे हडपसर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई आहेत. ते रात्रपाळीत कामाला होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते घरी गेले असता. घराची खिडकी उघडी होती व बेडरूमची लाईट चालू होती. त्यामुळे त्यांनी घरात पाहिले असता साडीच्या सहाय्याने पूनम हिने फॅनला गळफास घेतल्याचा व मुलाचा उशीने गळा दाबून खून केल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात पूनमने या घटनेस कोणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे. 

पूनमचे वडील सुरेश जगताप म्हणाले, ''मुलीला सासुरवास होता. तीचे लग्न चार वर्षांपूर्वीच झाले होते. ती सतत आम्हाला फोन करून सासरवास होत असल्याची माहिती देत. मात्र परिस्थित सुधारेल या हेतूने आम्ही तिला समजावून सांगत होतो. आम्ही घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT