aalephata
aalephata 
पुणे

चाळकवाडी टोलनाका बंद आंदोलन होणारच - अतुल बेनके

अर्जुन शिंदे

आळेफाटा (पुणे) : पुणे - नाशिक महामार्गावरील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथील टोलनाका बंद करण्याचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचे काल (ता.13) केलेले आंदोलन हा राजकीय स्टंट असून, त्यांनी त्यांचे अपयश लपवण्यासाठी पूर्णपणे राजकीय हेतूने केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका करून, येत्या रविवारी (ता. 15) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने चाळकवाडी टोलनाका बंद करण्याचे आंदोलन होणारच असा निर्धार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.                  

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने येत्या रविवारी (ता.15) युवानेते अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या चाळकवाडी टोलनाका बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आमदार शरद सोनवणे यांनी दोन दिवस आधीच आंदोलन करून चाळकवाडी टोलनाका बंद  केल्याने, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने याविषयी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आळेफाटा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी युवानेते अतुल बेनके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लेंडे, पंचायत समिती सदस्य शाम माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अतुल बेनके पुढे म्हणाले की, आमदार सोनवणे यांनी हा टोलनाका चालू - बंद करण्याचे प्रकार यापूर्वीही अनेक वेळा केले असल्याने त्यांची विश्वासार्हता राहिलेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (ता.१५) होणाऱ्या आंदोलनात खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यासह अनेक संस्था - संघटना सहभागी होणार आहेत. पुणे - नाशिक महामार्गावरील आळेफाटा ते पुणे दरम्यानच्या विविध बाह्यवळण रस्त्यासह रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय, तसेच प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व न्याय मिळाल्याशिवाय टोलनाका सुरु होऊ देणार नसल्याचेही अतुल बेनके यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी बोलताना पांडुरंग पवार यांनी लोकप्रतिनिधींनी कोणावरही वयक्तिक टीका करू नये असे मत व्यक्त केले. तर जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे मत शरद लेंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT