खेड-शिवापूर (ता. हवेली) : टोल नाक्‍यावर मंगळवारी आंदोलन करताना शिवसैनिक.
खेड-शिवापूर (ता. हवेली) : टोल नाक्‍यावर मंगळवारी आंदोलन करताना शिवसैनिक. 
पुणे

खेड शिवापूर नाक्यावर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण आणि दुरवस्थेच्या विरोधात शिवसेनेतर्फे मंगळवारी खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर आंदोलन करण्यात आले. ३१ डिसेंबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करून इतर कामे वेगाने सुरू करण्यात येतील, असे आश्वासन रिलायन्स इन्फ्राने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. काही महिन्यांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणे- सातारा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्राकडून या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे मंगळवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर टोल फ्री आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, भोर तालुका शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, मुळशी तालुका शिवसेना प्रमुख संतोष मोहोळ, भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पांगारे, स्वाती ढमाले, दत्ता देशमाने, लाला रेणुसे आदी या वेळी उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान टोलवरून वाहने टोल फ्री सोडण्यात आली. 

रिलायन्स इन्फ्राने ३१ डिसेंबरपर्यंत रस्त्याची संथ गतीने सुरू असलेली कामे वेगाने सुरू करून रस्त्याची दुरुस्ती ताबडतोब पूर्ण करावी, अन्यथा पुढच्या वेळी शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रमेश कोंडे आणि कुलदीप कोंडे यांनी या वेळी दिला. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, रिलायन्स इन्फ्राचे सहव्यवस्थापक बी. के. सिंग, पुणे- सातारा टोल रोडचे महाव्यवस्थापक अमित भाटिया यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT