एपीडा  sakal
पुणे

पुणे : कृषी प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीवर अधिक भर द्यावा

‘अपेडा’, ‘वॅम्निकॉम’च्या वतीने प्रशिक्षण शिबिरात तज्ज्ञांचे मत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कृषी आणि सहकारी संस्थांनी कृषी प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीवर अधिक भर द्यावा. सहकारी संस्थांना निर्यातदारांशी जोडून पुरवठा साखळी सक्षम करण्यात यावी. त्यासाठी कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा), वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑप. मॅनेजमेंट (वॅम्निकॉम) यांच्यासह इतर संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली.

कृषी व सहकारी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ‘अपेडा’, ‘वॅम्निकॉम’ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडच्या वतीने सहकारी आणि कृषी निर्यात विपणन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत पहिला प्रशिक्षण कार्यक्रम ३ ते ६ मार्चदरम्यान ‘वॅम्निकॉम’च्या कॅम्पसमध्ये पार पडला. अध्यक्षस्थानी सहकार मंत्रालयाचे सचिव डी. के. सिंग होते. ‘अपेडा’चे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू, सचिव डॉ. सुधांशू, ‘आयआयएफटी’चे प्रा. आशीष पांडे, आणि ‘वॅम्निकॉम’च्या संचालिका डॉ. हेमा यादव आदी या वेळी उपस्थित होते.

सिंग म्हणाले, ‘‘संकलन केंद्रे, एकात्मिक पॅकहाऊस, रीफर व्हॅन अशा कापणीनंतरच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि सहकारी संस्थांनी कृषी-निर्यातीतून त्यांचा परतावा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.डॉ. अंगमुथू यांनी निर्यातीत ज्ञानाची देवाणघेवाण आणि गुणवत्ता पैलूंवर भर दिला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘लोकल आणि स्थानिक गो ग्लोबल’ या आवाहनाच्या अनुषंगाने कृषी निर्यात आणि सहकार क्षेत्रातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अपेडा कृषी सहकारी संस्थांना साहाय्य करीत राहील.

‘एपीईडीए’ चे सचिव डॉ. सुधांशू यांनी निर्यात वाढविण्यासाठी सहकारी संस्थांना निर्यातदारांशी जोडण्यावर आणि अखंड पुरवठा साखळी सक्षम करण्यावर भर दिला. डॉ. यादव यांनी यांनी प्रक्रिया, विपणन आणि पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी सहकारी संस्थांचे योगदान वाढविण्यावर भर दिला.या प्रशिक्षण कार्यक्रमात ११ राज्यांतील एकूण ३१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात अमूल डेअरी, नाफेड, ओमफेड, नागरी सहकारी बॅंका, साखर सहकारी संस्था अशा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक डॉ. सागर वाडकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT