Agricultural University Examination Schedule Announced Pune 
पुणे

कृषी विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळपत्रक जाहीर; वाचा 'ही' महत्वाची बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : आकृती विद्यापीठांचे परीक्षांचे वेळपत्रक जाहीर झालेले असताना आता कृषी विद्यापीठाने परीक्षेचा कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये पदविका, कृषी तंत्र निकेतन आणि पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षातील शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांची जून महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना अतंर्गत मुल्यांकनावर पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने मार्गदर्शक तत्व जाहीर केले आहेत.ल त्यानुसार शिक्षण समन्वय समितीने राज्यातील कृषी विद्यापीठ व संलग्न संस्थांच्या परीक्षेचा आराखडा तयार केला आहे.

पुणे विद्यापीठ करतेय तब्बल 'एवढ्या' विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी नियोजन​

पदविका अभ्यासक्रम (दोन वर्ष) : प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यांकनावर करून द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाईल. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल. 

मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला मिळणार 'एवढी' रक्कम!

तंत्रनिकेतन (तीन वर्ष) : प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अतंर्गत मुल्यांकनावर पुढील वर्षांत प्रवेश. अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ८  ते १५ जून दरम्यान लेखी परीक्षा घेतली जाईल. 

 पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा

पदवी (चार वर्ष) : पदवीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के मूल्यांकन चालू तर ५० टक्के गुण मागील सत्राच्या मूल्यांकनातून देण्यात येतील व पुढील वर्षात प्रवेश. तर शेवटच्या आठव्या सत्राची परीक्षा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १५ जून पुर्वी ऑनलाईन व ऑफलाईन घातली जाईल व निकाल १५ जुलैपुर्वी जाहीर होईल. 

पुण्यात परप्रांतीय मजुरांकडे दुर्लक्ष का?

पदव्युत्तर (एमटेक, एसएससी) : लाॅकडाऊन संपल्यावर अंतीम सत्राच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेतल्या जातील. शोधनिबंध सादर करण्यासाठी ३१ मे ऐवजी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

- पदवीच्या तिसऱ्या, पाचव्या सत्राची नोंदणी १ ऑगस्ट तर सातव्या सत्राची नोंदणी १ जुलै रोजी होणार
- पदवीचे नवीन वर्ष २ सप्टेंबर पासून सुरू होणार
- लाॅकडाऊन वाढल्यास वेळपत्रकात बदल होऊ शकतो

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT