wari-a.jpg
wari-a.jpg 
पुणे

 #SaathChal आळंदी ते पंढरपुर सायकलवारीच्या माध्यमातून एडस् विषयी प्रबोधन

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : आषाढी वारीच्या माध्यमातून संतानी समाजातील अनिष्ठ प्रथा, अंधश्रध्दाविषयी प्रबोधन केले. सध्या एडस् रोगामुळे व एडस् ग्रस्तांना सामाजाकडुन मिळणाऱ्या वागणुक यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. या अत्यंत ज्वलंत विषयावर वारीच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे यासाठी आळंदी ते पंढरपुर सायकलवारीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत आहे. समाजाने एडसग्रस्तांना मानवतेची वागणुक द्यावी यासाठी वारीच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे असे प्रतिपादन परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडेमी ऑफ रिसर्चचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांनी केले.  

येथील कला महाविदयालयामध्ये आळंदी ते पंढरपुर सायकलवारीच्या माध्यमातून एडसविषयी प्रबोधन उपक्रमाअंतर्गत विदयार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमासाठी डॉ. जयप्रकाश खरड, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज शेख, आकाश गिते, प्राचार्य भास्कर गटकुळ, प्रा. पद्ममाकर गाडेकर उपस्थित होते. डॉ. चांडक म्हणाले, राज्यामध्ये १ ते १८ वर्ष वयोगटातील सुमारे २२ हजार एडसग्रस्त मुले आहे. समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अंत्यत नकारात्मक आहे. सायकलवारीतुन मागील पाच वषार्पासुन यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचा भाग म्हणुन कोकण, छत्तीसगड, राजस्थान, पनवेल-पंढरपूर, पणजी, विदर्भ-मेळघाट असा सायकल प्रवास केला आहे.

प्रवासा दरम्यान शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था यांच्या सोबत एड्स बाबत संवाद साधुन एडसविषयी असलेले गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रास्ताविक सुरेंद्र शिरसट यांनी केले सुत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत चवरे यांनी मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT