Pune News
Pune News  sakal
पुणे

Pune News : भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मच्या गाईंसाठी चारा ; दूध उत्पादन वाढीसाठी देशभर अल्प दरात चारा पुरविण्याचे उद्दिष्ट

डी. के. वळसे पाटील

मंचर : येथील पराग मिल्क फूड्स लिमिटेडची उपकंपनी भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मला गाईच्या दुध उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी सात समुद्रापार असलेल्या अमेरिकेने तब्बल दोनशे टन चारा पाठविलेला आहे. दररोज या चाऱ्यामुळे किती दुध उत्पादन वाढणार याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर भारत व अमेरिका या दोन देशामधे सामंजस्य करार झाल्यानंतर देशातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना माफक दरात चारा पुरविण्याचे नियोजन केले जाणार आहे.

मंचर (ता.आंबेगाव) येथे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्ममध्ये तीन हजार ५०० पेक्षा अधिक गाई व बोटाजवळ १५ हजार हून अधिक गाईंचे व्यवस्थापन करण्यासाठी विस्तार प्रकल्प सुरु आहे. यू.एस.ए फोरेज कौन्सिलचे संचालक जॉन, स्टीव, ग्रेग व माईक हे कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन व उटाह येथील अल्फाल्फा गवताचे मालक व उत्पादक आहेत. भाग्यलक्ष्मीला गवत पुरवले आहे. यावेळी पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा, सचिन शहा, संजय मिश्रा, एडमंड पायपर डॉ. अमोल हांडे, अतुल मंडलिक व अनिकेत थोरात यांच्या बरोबर चर्चा केली.

“अमेरिकेत मोठ्याप्रमाणे गवताचे उत्पादन होते. भारतीय मानकांना प्रमाणे सर्व शासकीय चाचण्या करून प्रयोगिक तत्वावर भारतात चारा आणला आहे. दूध उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून या उपक्रमाला यू.एस.ए सरकारचे समर्थन आहे. चाऱ्याचे पौष्टिक फायदे व दुग्धोत्पादनावर होणारे परिणाम यावर पुढील चाचण्या करून उच्च-गुणवत्तेच्या दुधाची उपलब्धता होईल.

“दररोज चारा सेवन करणाऱ्या गाईंची कसून चाचणी घेतली जाईल. उत्पादन होणाऱ्या दुधा बाबत यू.एस.ए पथका समवेत चर्चा करून अवाहाल सदर केला जाईल. या सहयोगी प्रयत्नाचा उद्देश केवळ भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म बरोबरच देशभरातील शेतकऱ्यांना दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे आहे. ज्यामुळे ते इतर नगदी पिकांवर लक्ष केंद्रित करू शकतात व त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात.”

देवेंद्र शाह, चेअरमन, पराग मिल्क फूड्स लि. अवसरी खुर्द मंचर.

“अमेरिका-भारत व्यापार संबंध व स्थानिक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण याबाबत सकारात्मक चर्चा झाली. दोन देशांमधील कृषी क्षेत्रातील सहकार्याला चालना देऊन. भारतातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर व अन्न सुरक्षा वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.”

जॉन, संचालक, यू.एस.ए फोरेज कौन्सिल.

मंचर (ता.आंबेगाव) : भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म गाईच्या दुध उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी उपलब्ध झालेल्या चाऱ्या विषयी चर्चा करताना पराग फूडचे अध्यक्ष देवेंद्र शहा (उजवीकडून दुसरे) व अमेरिकन शिष्टमंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT