Mental Hygiene
Mental Hygiene Sakal
पुणे

आता गरज मानसिक स्वच्छतेची! ‘एम्स’च्या डॉक्टरांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूंचा (Cornavirus) प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे, शारीरिक अंतर ठेवणे आणि हात स्वच्छ धुणे ही त्रिसूत्री अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा समाजाच्या मानसिक स्वास्‍थ्यावरील (Mental Health) दुष्परिणाम रोखण्यासाठी मानसिक स्वच्छतेची गरज (मेंटल हायजिन) (Mental Hygiene) नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) मानसशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. (AIMS Doctors Appeal for Mental Hygiene Needed Now)

वैश्विक साथीचा जसा शारिरिक आरोग्यावर परिणाम होतो, तसाच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. देशात मानसिक स्वच्छतेची गरज लक्षात घेता, एम्सच्या डॉ. महादेव सिंग सेन, डॉ. निष्ठा चावला आणि डॉ. राजेश सागर यांनी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशभरातील नागरिकांमध्ये औदासीन्य आणि चिंतेचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढल्याचे डॉ. राजकुमार आर. पी. यांच्या शोधनिबंधातून पुढे आले आहे.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे...

ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्यायोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल, सुफल व उत्पादनक्षमरीत्या कार्यरत राहील व समाजाप्रति योगदान देऊ शकेल.

मानसिक स्वच्छता म्हणजे...

मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्याच्या बदलत्या वातावरणानुसार किंवा आजूबाजूच्या परिस्थितीनुसार शारीरिक अवयव आणि संस्था यांच्या योग्य हालचाली करणे, मानसिक आजारात रूपांतर होणाऱ्या सवयी किंवा लक्षणांची वेळीच दखल घेऊन उपाययोजना करणे.

कोरोनातून सावरलेल्या रुग्णांबरोबरच त्यांचे कुटुंबीय, बेरोजगार व्यक्ती, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, लहान मुले अशा सर्वांनाच मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्या जाणवत आहेत. कोरोनाप्रमाणे हीपण एक वैश्विक साथ असून, रोजच्या व्यवहारात मानसिक स्वच्छतेच्या गोष्टी पाळणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणेबरोबरच समाज घटकांनीही याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

- डॉ. राजेश सागर, मानसशास्त्र विभाग, एम्स, नवी दिल्ली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT